![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/10/download-4-6.jpg)
अहमदनगर : अजित पवार जरी विरोधीपक्ष नेते असले तरी विकास कामात सरकारला त्यांचे नेहमीच सहकार्य असत आणि हेच महाराष्ट्राला अभिप्रेत आहे अशा शब्दात विखे पाटलांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांच कौतुक केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर आक्रमक टिका करत नाहीत यासंदर्भात प्रसार माध्यमांनी विचारले असता विखे पाटलांनी अजित दादांच कौतुक करत सूचक प्रतिक्रिया दिली.
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रशांवर त्यांनी प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
अजित पवारांच्या मनात काय आहे? हे माहीत नाही. मात्र, काळाच्या ओघात ते लोकांच्या समोर येईलच.
शेवटी द्वेषाने आणि व्यक्तिगत राजकारण करण्याची त्यांची भुमिका दिसत नाही. विरोधाला विरोध करणे ही विरोधी पक्षनेत्यांची भुमिका कधी राहिली नाही. विरोधाला विरोध न करता विकासात्मक राजकारण करणार आहे. हेच महाराष्ट्राला अभिप्रेत आहे.ते भाजपात येतील की नाही याबाबत मी भाष्य करणार नाही मात्र ते मोठे नेते असून त्यांचा निर्णय घ्यायला ते समर्थ असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.