देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
देवळाली प्रवरा नगरपरिषदेला ‘क’ वर्ग नगरपरिषदेत केंद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत पश्चिम भारत विभागात ३ रा व महाराष्ट्रात ३ रा क्रमांक मिळाला आहे. या शिवाय गारबेज फ्री सिटीमध्ये थ्री स्टार मानांकन व ओडिफ डबल प्लस मानांकन जाहीर झाले आहे. याबद्दल देवळाली प्रवरातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने मुख्याधिकारी अजित निकत यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, काँग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, नगरसेवक शैलेंद्र कदम, डॉ. विश्वास पाटील, दीपक त्रिभुवन, आदिनाथ कराळे, दीपक पठारे, प्रदीप गरड, ज्ञानेश्वर वाणी, तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक खुरुद, माजी संचालक अरुण ढुस, युवक काँग्रेसचे कुणाल पाटील, कारभारी होले, रफिक सय्यद, भागवत मुसमाडे, देवराम कडू, सचिन चव्हाण, योगेश वाळुंज आदींसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.