सातारा : येथील धम्मबांधव उत्सव कमीटीचे प्रमुख मार्गदर्शक बंधुत्व जीवनगौरव पुरकार विजेते शाहिर माधव अण्णा भोसले यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात २ मुले, सुना,एक मुलगी,जावई,नातवंडे, भाऊ-भावजय असा मोठा परिवार आहे.निवासस्थानी अंत्यदर्शन घेऊन अनेकांनी आदरांजली अर्पण केली असून अंत्ययात्रेत अनेक मान्यवर सहभागी झाले होते. सायंकाळी क्षेत्र माहुली येथे कृष्णा काठी अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळीही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.