मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचे प्रेरणेने श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती आक्रमक लढा उभारणार
देवळाली / प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून शासन दरबारी श्रीरामपूर जिल्हा Shrirampur District श्रेयवादात रखडला आहे. निकषाचे आधारे बहुतांशी कार्यालये श्रीरामपुरात चालू आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेकदा जनआंदोलने झाली.मात्र श्रीरामाचे नावाने श्रीरामपूर जिल्हा होत नसल्याने जिल्हाभर नाराजीची चर्चा सुरु आहे. गतिमान सरकार म्हणून शिंदे-फडणवीस-पवार-विखे पाटील यांनी तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. अन्यथा लढा आणखीन आक्रमक करून वेळ प्रसंगी श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी हुतात्माहि होऊ असा ईशारा श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र लांडगे म्हणाले, मराठा समाज आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जिल्हा दौरा निमित्ताने राहुरी फॅक्टरी येथे सत्कार केला. दौऱ्या दरम्यान प्रचंड गर्दीत देखील श्रीरामपूर जिल्हा चळवळीची माहिती जरांगे पाटलांनी समजावून घेत चांगलीच दाद दिली.