श्री रेणुकादेवी शरद कारखान्याचा बॉयलर अग्रिप्रदिपन संपन्न. 

0

पैठण,दिं.२४.(प्रतिनिधी):श्रीक्षेत्र चोंडाळा ता.पैठण येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या  २०२३-२४ च्या आठव्या गळीत हंगामाची बॉयलर अग्निप्रदीपनचा कार्यक्रम दि. २४ ऑक्टोंबर २०२३ सोमवार रोजी सकाळी १० वाजता कारखान्याचे चेअरमन विलास(बापू)भुमरे,यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे संचालक नितीन जनार्धन तांबे व रुपा तांबे, ब्रम्हदेव सुखदेव नरके व सुमन सुखदेव नरके यांच्या हस्ते सपत्नीक शुभास्ते विधिवत पूजन संपन्न झाली. कारखान्याचे रिपेअर व मेंटेनन्स चे काम पूर्ण झाले,त्यामुळे कारखाना लवकर सुरू करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी होईपर्यंत कारखाना सुरू ठेवून पूर्ण क्षमतेने गाळप करणार आहे,

यावेळी कारखान्याचे संचालक,आफसर शेख,भरत तवार,सुभाष चावरे, सुभाष गोजरे, दिलीप बोडखे,अक्षय डुकरे,चंद्रकांत गवांदे, लक्ष्मण डांगे,विष्णू नवथर, भीमराव वाकडे,नाना गाभुड, कल्याण धायकर,ज्ञानदेव बढे, हे उपस्थित होते.यावेळी,मुकेश काला,लहु पाटील,दत्तात्रय वाकडे, श्री रेणुकादेवी शरद मिलचे दत्तात्रय रेवडकर,दासाभाऊ रेवडकर,मुख्य कार्यकारी आधिकारी नामदेव बावडकर,ऑफिस सुप्रीडेंट श्रीमंत टेकाळे,चिप इंजिनीयर मालुसरे,प्रोडक्शन मॅनेजर आप्पासाहेब पेरने,चिप कॅमिस्टर आशोक थोटे, परचेस ऑफिसर चंद्रकांत पाटील, डेपोटी चिप अकाउंटंट रमेश झिरपे,स्टोर कीपर सतीश देशमुख, गोडाऊन कीपर सोमनाथ मुळे,हर्षद दुबाले,प्रफुल आवारे, सुरक्षा अधिकारी जनार्दन खरात सह विहामांडवा येथील गावातील बप्पासाहेब येळे,सुनिल डुकरे,पाडुरंग पवार,दिपक गाभुड, गणेश करताडे,हारून शेख,कल्याण चौधरी,शकिल शेख, शेखर शिंदे, बाळासाहेब माने, प्रशांत जगदाळे, पिंपळवाडी उपसरपंच दादासाहेब गलांडे, डॉ संजय गंगवाल,कौसर शेख,अफसर शेख सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here