संगमनेरात आरोपींची मुजोरी ; चक्क पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ 

0

संगमनेर : संगमनेर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असताना या गुन्हेगारीतून गुन्हेगारांचे मनोधर्य ही वाढले असल्याचा प्रत्यय चक्क संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकाला आला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून दमबाजी केल्याची घटना संगमनेर शहरात मंगळवारी घडली. 

       याबाबतची माहिती अशी की शहरातील अकोले नाका परिसरातील जाजू पेट्रोल पंपाजवळ मंगळवार (दि.२०) सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास संतोष दशरथ जेडगुले (रा.अकोले नाका संगमनेर) आणि आदित्य संपत सूर्यवंशी (रा.साईनगर, संगमनेर) हे भांडण करीत होते. त्यावेळी शहर  पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बारकू झिंगा जाणे यांनी हे भांडण सोडविल्याचा राग मनात धरून संतोष जेडगुले आणि आदित्य सूर्यवंशी या दोघांनी पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ केली. तसेच पाहून घेऊ असा दम देऊन त्यांचे अंगावर धावून गेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील दोघा आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ८१४/२०२२ भा.द.वी कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दाखल केला आहे. दरम्यान संगमनेर शहरात चक्क पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून दम देऊन बघून घेण्याची भाषा केली जात असल्याने संगमनेरात पोलिसांचा वचक कमी झाला की काय ? असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here