संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या १२ विध्यार्थ्यांची क्लासिक व्हील्स मध्ये निवड – अमित कोल्हे

0

.

ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी संजीवनी कटीबध्द

कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ( टी अँड पी ) विभागाने आयोजीत केलेल्या क्लासिक व्हील्स कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कंपनीने मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग विभागातील अंतिम वर्षातील १२ नवोदित अभियंत्यांची निवड केली असुन सुरूवातीस प्रशिक्षण  काळात त्यांना कंपनीने वार्षिक वेतन रू ३ लाख देवु केले आहे, मागील अनेक वर्षांपासून  ग्रामीण भागातील हजारो विध्यार्थ्यांना संजीवनी मार्फत नोकऱ्या  देण्यात आल्या आहेत, यापुढेही ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कटीबध्द आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

         पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की संजीवनीच्या विविध विद्या  शाखांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विध्यार्थ्यांना कंपनी निहाय प्रशिक्षण देणे, त्यानंतर कंपन्यांना कॅम्पस मुलाखतींसाठी पाचारण करणे, व विध्यार्थ्यांना नोकरी मिळवुन देणे, इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. मात्र कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर नवोदित अभियंत्यांनी त्यांच्या कंपनीनुसार अद्ययावत ज्ञान घेत प्रामाणिकपणे सेवा देत स्वतः प्रगती साधायची असते.भारतातील अग्रगण्य स्थिती असलेल्या क्लासिक व्हील्स या जागतिक ऑटोमोटिव्ह स्टील आणि अलॉय रिम उत्पादक कंपनी, जिची दरवर्षी १२ दशलक्ष पेक्षा अधिक व्हील रिम उत्पादन करण्याची क्षमता आहे. अलिकडेच या कंपनीने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये निवड केलेल्यां मध्ये अंतिम वर्षातील प्रणवकुमार प्रविण चव्हाण, सनी गजानन दुसाने, प्राज शिवाजी काळे, विनित दत्तात्रय रोडे, सुजित संतोष  सोणवने, शुभम सुनिल वाबळे, तेजस सोपान वरकड, राहुल धर्माजी चव्हाण, संकेत बाळासाहेब कर्पे, राहुल सुनिल मलिक, प्रसाद देविदास विसपुते व तेजस डिगंबर येवले यांचा समावेश आहे.
         संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या उपस्थित विध्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. आर. ए. कापगते, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. व्ही. एम. तिडके, मेकॅट्रॉनिक्स विभागाचे टी अँड पी विभागाचे समन्वयक  प्रा. अभिनंदन कोंडेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here