फलटण, उद्धव बोराटे : महात्मा जोतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे विचार मानवतावादी व विज्ञाननिष्ठ असून या विचारांची जोपासना कृतिशील कार्य करून हा विचारांचा वारसा पुढे नेण्यात यावा . रूढी परंपरांना मूठमाती देऊन शिक्षणाला महत्व प्राप्त करून दिले जाईल तेव्हाच खरे सत्यशोधन होईल असे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉ बी के यादव यांनी सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त संत सावतामाळी ट्रस्ट येथे महात्मा फुले विचार अभियान ,महाराष्ट्र व महात्मा फुले विचार मंच फलटण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते . प्रारंभी संत सावता महाराज , महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या मुला मुलींचे विवाह सत्यशोधक पद्धत्तीने करणाऱ्या गोखळी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भागवत व चौधरवाडी येथील तुकाराम कोकाटे यांचा तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी केशवराव जाधव सर यांची निवड झाल्याबद्दल यथोचित सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह,महात्मा फुले प्रतिमा, सन्मानपत्र,पुच्छगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले . महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा सत्यशोधक समाज ही आजची आणि उद्याची ही गरज आहे या साठी आपल्या कुटुंबीयांपासून संघर्ष करावा लागतो. विज्ञानवादी विचार घेऊन पुढे गेल्यास खरे सत्यशोधन करता येईल असे कोकाटे यांनी सांगितले . साहित्यिक तानाजी जगताप म्हणाले महात्मा फुले यांच्या समता, कृषी सामाजिक, सत्यशोधक जाती निर्मूलन, स्त्री शिक्षण या क्षेत्रात केलेले सामाजिक कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक्षात संविधानाच्या चौकटीत आणले सुजाता ननावरे, राजेंद्र भागवत यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रा नितीन नाळे , संजय कर्पे, साहित्यिक तानाजी जगताप , प्रा सतीश जंगम ,प्रा रुपाली सस्ते,माळी सेवा संघाचे पदाधिकारी राजाराम जाधव, सुजाता ननावरे सौ जयश्री पाटणे ,आमिरभाई शेख ,राजेंद्र बोराटे मा नगरसेवक अशोकराव जाधव , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, राजेश बोराटे,शबना पठाण,स्वाती अडसूळ, अपर्णा गंगतीरे, प्राध्यापिका शामल शिंदे,प्रा.जी.एम.जाधव, संजय करपे, अनिल गावडे पाटील,उमेश ढमाळ,उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी उद्धव बोराटे, , प्रशांत शिंदे ,सुखदेव फुले,विकास शिंदे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय अब्दागिरे व प्रास्ताविक अजित जाधव यांनी केले.प्रा बाळासाहेब घनवट यांनी आभार मानले.