कोपरगाव: विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे असे सांगणारे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक, माजी मंत्री स्वर्गिय शंकरराव कोल्हे यांच्या जीवन प्रेरणेतुन संजीवनी अकॅडमीच्या विध्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुण, कल्पनाशक्ती, सर्जनशिलता, वैज्ञानिक दृष्टीकोन , इत्यादी बाबी विकसीत करण्यासाठी संजीवनी अकॅडमीत सहकार महर्षि शंकरराव कोल्हे सायन्स एक्सपो हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले, यात विध्यार्थ्यांनी आधुनिक विज्ञानावर आधारीत एकुण ४५ उपकरणांचे सादरीकरण करून आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन न घडवुन परीक्षाकांसह सर्वांचीच वाहवा मिळविली, अशी माहिती स्कुलच्या वतीने देण्यात आली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी सदर प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी परीक्षक डाॅ. राकेश भल्ला, डाॅ. प्रियंका कोठारी, डाॅ. कुणाल कोठारी, डाॅ. अजय शाह , प्राचार्या शैला झुजारराव व शिक्षक उपस्थित होते.
इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या विध्यार्थ्यांनी रोबोटिक्स, फार्मिंग विधावुट साॅईल, मंगलयान, हायड्राॅलिक्स, ब्लड सक्र्युलेशन, स्मार्ट सिटी, हायपरलुप, अॅन्टीथेप्ट अलार्म, स्पेस शटल, इत्यादी विषयांशी निगडीत प्रदर्शनात उपकरणे सादर करून त्यांचे मुध्देसुद विश्लेषणही केले. इयत्ता ५ वी मधिल आरुष थोरात, शोल्क जाधव, कार्तिक वालीरमणी, उत्कर्ष खासणे, स्वारा शेवते, वेदांत कदम, निसदिश बोरावके, क्षितीजा वाके व प्रथमेश महाले यांनी थिफ कॅचर (चोर पकडण्याचे) हे उपकरण बनवुन त्याचे प्रात्यक्षिक दाखवुन प्रथम क्रमांक मिळविला. तर याच वर्गातुन वर्किंग माॅडेल ऑफ लंग्ज व स्मार्ट सिटी या प्रकल्पांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. इयत्ता ६ वीच्या ईशान सय्यद, सर्वेश शेळके, नील काटे, स्वरीत गोळेचा, दिव्यम कुदळे व ध्रुव पटेल या बाल वैज्ञानिकांनी ऑब्स्टॅकल अव्हाईडींग कार हा रोबोट बनविला. तर याच वर्गातील रीयुज, रेड्युस , रिसायकल आणि वाटर लेव्हल इंडिकेटर या प्रकल्पांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. इयत्ता सातवीच्या वर्गातील अन्वी दुबे, कार्तिकी भगाडे, आदिती जोर्वेकर व मिहीका काले यांनी हायड्रोपोनिक फार्मिंग हा प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक मिळविला. तर याच वर्गातील डे टू डे सायन्स व ग्लोबल वार्मिंग या प्रकल्पांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.
सर्वच परीक्षकांनी डाॅ. मनाली कोल्हे यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या या विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक केले. विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ म्हणुन संजीवनी अकॅडमीचे कौतुक केले. भविष्यातील येणाऱ्या नवीन शोधांचा वेध या प्रदर्शनातून न दिसुन येतो, असे मत डाॅ. भल्ला यांवी व्यक्त केले. बुध्दीला वाव देण्यासाठी संजीवनी अकॅडमी नेहमीच आघाडीवर असते, असे मत डाॅ. कोठारी यांनी व्यक्त केले. श्री पृथ्वीराज पाटील यांनी विध्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांचे तसेच त्याना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले.
सदर प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राचार्या झुजारराव, हेड मिस्ट्रेस रेखा साळुंके, बलराम साहु, वैशाली गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले.
फोटो ओळी: संजीवनी अकॅडमी आयोजीत विज्ञान प्रदर्शनाचे चे परीक्षण करताना परीक्षक.
Home महाराष्ट्र सहकार महर्षि शंकरराव कोल्हे सायन्स एक्सपो संपन्न ;बाल वैज्ञानिकांसाठी संजीवनी अकॅडमीचा उपक्रम