सातारा : Zilla Parishad जिल्हा परिषद भरतीच्या कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदांसाठी रविवारी (दि. 15) आणि वायरमन, जोडारी, पशुधन पर्यवेक्षक या पदांसाठी मंगळवारी (दि.17) जिल्ह्यातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा होणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांनी दिली.
जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती प्रक्रिया सहा वर्षापासून रखडली होती. कर्मचाऱ्यांअभावी कामांचा निपटारा होण्यात अडचणी येत असल्याने राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या विविध 21 संवर्गातील 972 पदांच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 5 ते 25 सप्टेंबर मुदत होती. त्यानंतर 7 ते 11 ऑक्टोबरदरम्यान रिंगमन, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी),
विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुलेखक (उच्चश्रेणी), कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. आता रविवारी दि. 15 रोजी प्रथम सत्रात सकाळी 7 वाजता कनिष्ठ लेखाधिकारी, द्वितीय सत्रात सकाळी 11 वाजता कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), तृतीय सत्रात कनिष्ठ अभियंता (विद्युत) दुपारी 3 वाजता परीक्षा होणार आहे. दि. 17 रोजी प्रथम सत्रात सकाळी 7 वाजता वायरमन, द्वितीय सत्रात सकाळी 10 वाजता जोडारी व तृतीय सत्रात दुपारी 1 वाजता पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी ऑनलाइन परीक्षा होणार असल्याचे नीलेश घुले यांनी सांगितले.