कुणाल दराडे फाउंडेशनकडून येवल्यात महिला दिनानिमित्त नारी सन्मान सोहळा
येवला, प्रतिनिधी…..
: संघर्ष हा शब्द कधीच जवळ ठेवू नका,तो नकारात्मक शब्द आहे.कष्ट आणि मेहनतीची तयारी ठेवली की महिलांना आकाश कवेत घेणं सोप आहे याची जाणीव ठेवा. महाराष्ट्रात अनेक सामाजिक चळवळी कार्यरत आहेत. या चळवळीमुळेच महिलांना आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी बळ मिळत आहे.येथील कुणाल दराडे फाउंडेशनचे महिलांसाठीचे कार्य हे असेच कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले.
कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने येथे आयोजित नारी सन्मान सोहळा तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे,लक्ष्मण दराडे,फाउंडेशनचे प्रमुख कुणाल दराडे,स्त्री रोग तज्ञ कविता दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी संदीप जाधव यांनी सादर केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने पैठणीसह भरघोस पारितोषिके देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.प्रारंभी सौ. कुलकर्णी व दराडे कुटुंबीयातील महिलांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. महिला दिनानिमित्त ग्रामीण भागातील महिलांसाठी संवाद साधावा यासाठी मी आवर्जून मुंबईहून येथे आल्याचे सांगत ही पैठणी नगरी महाराष्ट्राचा अभिमान आहे. येथील पैठणी आमचे भूषण असून महिलांच्या कार्यकर्तृत्वाला ती झळाळी देते असे सांगतानाच महिलांनी शिक्षण,आरोग्य सामाजकारण,राजकारण या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. माझ्यासारखी मुलगी चित्रपटसृष्टीत मेहनतीच्या जोरावरच नावलौकिक कमावते.त्यामुळे संघर्षापेक्षा मेहनतीला प्राधान्य द्या असा सल्ला त्यांनी दिला.
निवडणुका आल्या की राजकीय लोक कार्यक्रम घेतात परंतु कुणाल दराडे यांनी वर्षभर अव्याहतपणे महिलांसाठी उपक्रम राबवून महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सन्मानाचे व्यासपीठ दिल्याचे कुलकर्णी म्हणाला.प्रत्येक पुरुषाचेच नव्हे तर आख्या कुटुंबाचे अस्तित्व महिलेच्या हातात आहे.
येवल्यासारख्या ठिकाणी महिलांच्या अंगी कलागुण असूनही व्यासपीठ मिळत नाहीत. त्यामुळे फाउंडेशनने वर्षभर महिलांच्या सन्मानाचे व प्रेरणादायी उपक्रम हाती घेतल्याची माहिती कुणाल दराडे यांनी दिली.
यावेळी सिनेकलाकार संदीप जाधव यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमातून महिलांचे विविध खेळ घेत हास्याचे फवारे व करमणूक केली. महिलांच्या संदर्भात सौ. कुलकर्णी यांना प्रश्न विचारत महिलांच्या संदर्भात भूमिका जाणून घेतली.यावेळी माजी सभापती सुरेखा दराडे,आशा दराडे,अनिता दराडे,सिध्दांत दराडे आदींची देखील विशेष उपस्थिती होती.
फाऊंडेशनचे संजय शिंदे,संतोष विंचू,विजय गोसावी,मकरंद तक्ते,डॉ.महेश्र्वर तगरे,जयवंत खांबेकर,कल्पेश पटेल,शिवाजी सताळकर, अरुण गायकवाड, योगेश सोनवणे,राहुल भावसार,अमित अंकाईकर, मंदार खैरे,सुमित गायकवाड,ऍड.राहुल राशीनकर,संजय गायकवाड,पवन लोणारी, आत्मेश विखे,योगेश लचके,राहुल भांबारे, प्रतीक हेबाडे,ऋषिकेश करहेकर आदींनी नियोजन केले.
● या झाल्या विजेत्या..
संदीप जाधव यांनी महिलांचे विविध गमतीदार खेळ घेऊन या कार्यक्रमाची रंगत वाढविली. शंभरावर महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेत खेळण्याचा आनंद लुटला.यात सोनल कोकाटे यांनी प्रथम क्रमांक मिळवत पैठणी साडीचे बक्षीस जिंकले.पंचशीला पगारे, योगिता भोसले,सायली खंदारे,दिपाली खडांगळे,किरण गायकवाड,भारती पगारे, रूपाली पवार या महिला विजेत्या झाल्या. सर्वांना विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले तसेच उपस्थित महिलांमधून देखील लकी ड्रॉ काढून त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
” महिला दिन महिलांच्या सन्मानाचा दिवस असतो. यानिमित्ताने त्यांचा सन्मान व करमणूक करण्यासह नावलौकिक असलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. अडीच ते तीन हजारावर महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आनंद घेतला.”
–कुणाल दराडे, संस्थापक,कुणाल दराडे फाऊंडेशन, येवला