बुलडाणा, (प्रतिनिधी)- शिवसेना शिंदे गटाचे नेते सिडको महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रवक्ते संभाजीनगर औरंगाबादचे कार्यसम्राट आमदार यांचा संभाजीनगर औरंगाबाद मधील सतारा परिसर सुधाकर नगर येथे सुधाकर नगरचे युवानेते सामाजीक कार्यकर्ते नितीन भाऊ मगरे यांच्या व शिवसैनिकांच्या उपस्थीतीत बुलडाणा जिल्ह्याचे रिपाई आठवलेचे निष्ठावंत कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी पुष्प हार घालून रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने सिडकोचे अध्यक्ष झाल्याबद्दल हर्दयस्पर्शी सत्कार केला व पूढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व होऊ घातलेल्या विधान सभेच्या राजनीतीवर चर्चा केली.
रिपाई आठवले हा महायुतीचा मुख्य घटक पक्ष आहे त्यांना महायुतीत सन्माने महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार संघात सन्मानाने वागणूक द्या व रिपाईच्या प्रत्येक कार्यकरत्याला होऊ घातलेल्या विधानसभेत महायुतीच्या उमेव्दाराला सक्त ताकीद द्या मित्र पक्ष आठवलेंच्या कार्यकरत्याना प्रत्येक विधान सभा मतदार संघात सोबत घेवून प्रचार करा कार्यक्रमात मानासन्माने वागणूक द्या. एकाला घेवून चालू नका ? वनमॅनशो करू नका ? सर्वांना सोबत विश्वासात घेवून महायुतीचे काम करा यश आपलेच आहे.
रिपाईनेते राष्ट्रीय आध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री भारत सरकार रामदास आठवले हे जूने महायुतीचे घटक मित्र आहे. त्यांनी ज्या महाराष्ट्रातल्या १२ जागा मागितल्या आहे. त्या सन्मानपूर्वक द्या व निवडून आणून सन्मानपूर्वक आम्हाला सत्तेत सहभागी करा. अशी मागणी बाबासाहेब जाधव यांनी आमदार संजय सिरसाठ यांच्याकडे सत्काराच्या प्रसंगी केली.