उरण दि २३(विठ्ठल ममताबादे ) : सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुपचे यावर्षीचे पावसाळी गेट टू गेदर रविवार दिनांक २३ जून २०२४ रोजी बापूजी मंदिर चिरनेर परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेले मित्र यावेळी आवर्जून उपस्थित होते.शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.बालपणीचा काळ सुखाचा होता असेही मत काहींनी व्यक्त केले. या ग्रुप मधील अनेकांनी अतिशय कठीण परिस्थितीत कष्ट करून शिक्षण घेतले .या ग्रुपकडून बापूजी मंदिर परिसरात आंबा आणि करंज वृक्षांची लागवड करण्यात आली.वृक्षारोपण करून इतर पर्यावरणप्रेमींना देखील हा चांगला संदेश देण्यात आला. त्याचबरोबर ही झाडे जगविण्यात येतील ही हमी त्यांनी दिली.पर्यटकांकडून या परिसरात प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक पिशव्या टाकल्या जातात . त्यादेखील उचलून या परिसराची साफसफाई करण्यात आली. यापुढील प्रत्येक गेट टू गेदर आणि सहलीत किमान एकतरी सामाजिक ,शैक्षणिक आणि ऐतिहासिक उपक्रम राबवायचा असे ठरविण्यात आले. या ग्रुप कडून प्रत्येक सहलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किल्ला पाहिला जातो.आता येणाऱ्या सहलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे
जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला पहायचे सर्वानुमते ठरवण्यात आले.या गेट टू गेदर ला ग्रुप ऍडमिन मिलिंद खारपाटील, चंद्रहास म्हात्रे, सुर्यकांत म्हात्रे, पद्माकर फोफेरकर,प्रकाश फोफेरकर ,प्रकाश नारंगीकर, पंढरीनाथ नारंगीकर, सुरेश केणी,रोहिदास पाटील, सुभाष पाटील, दिपक म्हात्रे,राजेंद्र मुंबईकर, विजय पाटील, उपकार ठाकूर, प्रभाकर ठाकूर,रवींद्र पाटील,विजय मुंबईकर हे १७ वर्गमित्र उपस्थित होते.घरी परतताना सर्वांनी साश्रू नयनांनी एकमेकांचा निरोप घेऊन येत्या किल्ले शिवनेरी सहलीत सर्वांनी एकत्र भेटण्याचा निर्धार व्यक्त केला.