उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे ) खोपटे गावातील स्मशान भूमी मध्ये अत्यंसंस्कार झाल्यानंतर ज्येष्ठांना,दिव्यांग बांधवांना बसण्यासाठी जागा नव्हती. त्यामूळे ज्येष्ठांना, दिव्यांगांना बसण्यासाठी स्वराज्य ग्रुप खोपटे उरणच्या माध्यमातून कै. कु. जितेश जगन्नाथ ठाकूर यांच्या स्मरणार्थ बेंचसचे लोकार्पण सरपंच विशाखा प्रशांत ठाकर यांच्या हस्ते करण्यात आले स्मशान भूमीत बेंचेसची व्यवस्था झाल्याने गावातील नागरिक, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.अत्यंसंस्कारासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना आता स्मशान भूमी मध्ये बॅंचेस वर बसून आराम करता येणार असल्याने ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग बांधवानी स्वराज्य ग्रुप खोपटे उरणच्या कार्याचे कौतूक केले आहे.
यावेळी बांधपाडाचे सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, खोपटा अध्यक्ष विश्वनाथ भास्कर पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष प्रमोद ठाकूर, सदस्य अच्युत ठाकूर, सदस्या जागृती घरत, सदस्य संदेश म्हात्रे, बांधपाडा अध्यक्ष प्रकाश ठाकूर, द.पी पाडा अध्यक्ष यशवंत ठाकूर, खोपटा सचिव कुमार ठाकूर, पाणी कमिटी सचिव विष्णू पाटील, भाजपा खोपटा अध्यक्ष नवनाथ ठाकूर, समीर पाटील, स्वराज्य ग्रूप चे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, जितेशचे नातेवाईक तसेच स्वराज्य ग्रूप चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.