देवळाली प्रवरा :
नगर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयामध्ये न्यायालयीन खटल्यांचे कामकाज पाहण्याच्या दृष्टीने २३ वकिलांची विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी (दि. २०) ही निवड यादी जाहीर केली आहे. यामध्ये राहुरी फॅक्टरी येथील अँड.सविता गांधले- ठाणगे यांची निवड करण्यात आली.
विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता निवड समितीच्यावतीने सोमवारी (दि. १९) या पदासाठीच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीसाठी जिल्ह्यातून ८० उमेदवार उपस्थित होते. निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या निवड समितीने या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीत पात्र ठरविण्यात आलेल्या २३ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर करत त्यांची विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदी नेमणूक करण्यात आली आहे.
यामध्ये राहुरी न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून विधीज्ञ म्हणून काम करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील अँड.सविता गांधले- ठाणगे यांची निवड करण्यात सरकारी अभियोक्ता या पदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सविता गांधले-ठाणगे यांचे अभिनंदन केले आहे.
Attachments area