मुंबई : “अंधेरी-पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी,” असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी अंधेरी विधानसभेच्या बाबतीत आपल्या पक्षाची भूमिका मांडली या आधीही आपल्या पक्षाने पोटनिवडणुकीच्या बाबतीत अशीच भूमिका घेतली होती . “गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार दिला नव्हता. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. यातून महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं.
. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नाची उत्तरे देताना राज ठाकरे यांनीही अशाप्रकारची मागणी केली असेल तर त्यांचे स्वागतच केले पाहिजे. “राज ठाकरे यांनी काय लिहिलं, तो राज आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला पत्रव्यवहार आहे, त्याविषयी मला काही माहिती नाही,” असं पवार पुढे म्हणाले.