सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्व थरातील लोकांना चिकित्सा शिकवली. मोलाचे कार्यही केले आहे. त्यामुळेच समाजातील चमत्कार सदृश घटनांचे प्रमाण कमी झालेले आहे. तरीही अधूनमधून अंधश्रध्दायुक्त घटना घडताना दिसतात.तेव्हा सजगता असली पाहिजे.असे आवाहन प्राचार्या डॉ. भाग्यश्री जाधव यांनी केले.
सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, रहिमतपूर येथे शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनांतर्गत विवेकवाहिनी विभागाने आयोजित केलेल्या ” अंधश्रध्दा निर्मूलन ” या संदर्भात आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये प्राचार्या जाधव मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी महाराष्ट्र अंनिस जिल्हा प्रधान सचिव ऍड. हौसेराव धुमाळ, जिल्हा कार्याध्यक्षा वंदना माने,शहर कार्याध्यक्ष डॉ. दीपक माने व रहिमतपूर शाखेचे युवा कार्यकर्ते मोहसीन शेख उपस्थित होते.
“सर्वांनी चमत्काराला मी फसणार नाही व इतरांना फसू देणार नाही. अशी खुणगाठ मनाशी पक्की करूनच कार्यरत राहायला हवे.” असे आवाहन ऍड. धुमाळ यांनी केले.डॉ. दीपक माने यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार आपण करूनच जीवनातील आव्हानांना सामोरे जावू या.असे स्पष्ट करून बीनवातीचा दिवा पाण्याने पेटवणे, उभ्या दोरीवर कवटी इशा-यानुसार चालवणे – थांबविणे, हवेतून हात फिरवून सोनसाखळी काढणे आदी चमत्कार सादर केले. वंदना माने यांनी केवळ मंतरलेले पाणी शिंपडून कुंकवाचा बुक्का करणे व डोळ्यावर काळीपट्टी बांधून विविधरंगी चेंडूचे रंग ओळखणे या चमत्कारासह मन मनाचे आजारासंदर्भात मार्मिक विश्लेषण केले. मानसिक रूग्णांना मानसोपचाराची गरज असते.असेही विविध उदाहरणाद्वारे विषद केले. रहिमतपूर शाखेचे युवा कार्यकर्ते मोहसीन शेख यांनी भूत गडव्यात बंद करणे व मंत्राने अग्नी पेटवणे. या चमत्कारासह रहिमतपूर येथील आंतरजातीय विवाह केंद्राची माहिती देवून शाखा काय दक्षता घेते? ते स्पष्ट केले. यानंतर ऍड.हौसेराव धुमाळ यांनी कर्ण पिशाच्चाचे सहाय्याने बंद चिठ्ठ्यातील मचकूर ओळखण्याची किमया करून दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. डॉ. दिपक माने यांनी सर्व चमत्कारामागील वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले.शिवाय,भावी काळात चमत्कारावर विश्वास न ठेवण्याचे अवाहन केले. वंदना माने यांनी जीवन मार्गदर्शक व समाजहिताच्या उपयुक्त अशा पाच प्रतिज्ञाचे ग्रहण करून घेतले. सदरचे कार्यक्रमास रहिमतपूर शाखेचे कार्यकर्ते शिवाजी शिंदे, प्रविण माने, शंकर कणसे, चंद्रहार माने,प्रकाश बोधे, सिताराम माने या जाणकार कार्यकर्त्यांसह महाविद्यालयीन प्राध्याप,कर्मचारी व अध्ययनार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रा. प्रशांत साळवे यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. श्रीकांत बोधे यांनी आभार मानले.
फोटो : प्रतिज्ञा देताना म.अंनिसचे पदाधिकारी यांच्यासह प्रयोगाचे साहित्य व श्रोतावर्ग.(छाया – अनिल वीर)