अज्ञात वाहन आणि मालवाहू टेम्पोच्या धडकेत एक ठार ; पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घटना

0

संगमनेर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर कडून आळेफाट्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू टेम्पोने अज्ञात वाहनास धडक दिली. या धडकेत मालवाहू टेम्पो चालक जागीच ठार झाला. ही घटना काल सोमवारी घारगाव नजीक घडली.

        याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून संगमनेर कडून आळेफाटाच्या दिशेने मालवाहू टेम्पो भरदा वेगात जात होता. सदरचा टेम्पो काल सोमवारी पहाटे घारगाव शिवारातील हॉटेल लक्ष्मी जवळ आला असता या टेम्पोने अज्ञात वाहनास जोराची धडक दिली या धडकेत टेम्पोच्या पुढील भागाचा चक्काचुर झाल्याने टेम्पो चालक रामजतन मुलन सरोज (वय ४२) हा जागीच ठार झाला.अपघात झाल्याचे समजताच घारगाव पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार राजू खेडकर, पोलीस नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त टेम्पोतून चालकाला बाहेर काढत रुग्णवाहिकेतून संगमनेरला पाठवले होते.तर डोळासणे महामार्गाचे सुनिल साळवे, उमेश गव्हाणे, नंदकुमार बर्डै, योगीराज सोनवणे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.  दरम्यान या अपघातात मालवाहू टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून समोरचे वाहन नेमके कोणते होते ते मात्र समजू शकले नाही. याबाबत घारगाव पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here