उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) अनिरुद्धाज अँकडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरण Aniruddhaj Academy of Disaster Management Uran अंतर्गत सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्र या उपासना केंद्राच्या सहयोगाने रविवार दि ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ सायंकाळी ४:३० या वेळेत उरण नगरपरिषद शाळा क्र.१, पेंशनर पार्क समोर, उरण शहर येथे भव्यदिव्य असे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात दरवर्षी होणारा रक्ताचा तुटवडा व रक्ता अभावी होणारे मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणेही उरणमध्ये यावर्षीही रक्तदान शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. एकूण १६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सद्गुरु श्री अनिरुध्द उपासना केंद्र उरण व मुळेखंड उपासना केंद्रांच्या सर्व भाविक भक्तांनी विशेष मेहनत घेतली.
या रक्तदानामुळे रक्ता अभावी होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे. आपतकालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होणार आहे. या रक्तदानामुळे अनेकांचे यामूळे जीव वाचणार आहेत. त्यामूळे अनिरुद्धाज अकॅडमी मॉक डिझास्टर मॅनेजमेंट,सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड उपासना केंद्राने आयोजित केलेला रक्तदान शिबीराचा कार्यक्रम सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी व आदर्श आहे.