अनिल वीर सातारा : कथा,कविता आदी साहित्यातून व्यक्त होता येते.कविता तर उत्स्फूर्त असा आविष्कार असतो. स्वातंत्र्य अबाधित राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे.घटनेने तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. असे प्रतिपादन सह-संपादक रामदास नेहुलकर यांनी केले. जिल्हा ग्रंथमहोत्सवामध्ये कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून नेहुलकर बोलत होते. यावेळी जि.प.कार्यकारी अभियंता एम.आय.मोदी व विविध क्षेत्रातील मान्यवर व कवी उपस्थीत होते.
अबोल न राहता व्यक्त होणे गरजेचे आहे.तरच जीवन यशस्वीपणे पादाक्रांत कराल. स्पेन देशातील घटनेचे वर्णन करताना कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शरद पवार यांच्यासमोर मी मेणबत्ती घेऊन पुढे गेलो होतो.तेव्हा आजच्या पिढीने कोणत्यातरी प्रकारे पुढे आले पाहिजे.
सकाळी लहान मुलांसाठी प्रबोधन आणि रंजनपर कार्यक्रम सादर करण्यात आला.यामध्ये लेखिका स्वाती राजे यांचागोष्टीचे झाड या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर गोष्टी आणि गाणी हा कार्यक्रम डॉ. दिलीप गरुड (कार्यवाह ),अमरेंद्र भास्कर बाल साहित्य संस्था पुणे) यांनी सादर केले. दत्ता बनकर- माजी (उपनगराध्यक्ष),उपशिक्षणाधिकरी रवींद्र खंदारे (प्राथमिक) आणि व तेजस गंबरे (माध्यमिक) उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राचार्य प्रमोदिनी मंडपे यांनी केले.तद्नंतर निमंत्रितांचे कवी संमेलन आणि त्याचबरोबर सातारा मधील इतर कवींचे कवी संमेलनही संपन्न झाले.यामध्ये प्रसिद्ध कवी लेखक देवा झिंझाड,कवी अनिल दीक्षित , पुण्याचे प्रसिद्ध हास्य कवी बंडा जोशी आणि माणदेशच्या कवयित्री कांता भोसले, सीमा मंगरुळे , प्रमोद जगताप ,नरेंद्र निकम,सौरभ दुबे,अनिता जाधव,दत्तात्रय पांढरे,डॉ.शुभांगी कुंभार ,हेमा जाधव ,सिद्धनाथ वावरे ,वसुंधरा निकम ,क्रांती राणे-पाटील आदींनी कवीता व त्यांच्या रचना सादर केल्या.काय ते पत्रात लिवा..या वास्तवादी कवितेला टाळ्या अधिकच्या मिळाल्या. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी प्रदीप कांबळे यांनी केले.राजकुमार तथा आर.पी. निकम यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास वि.ना.लांडगे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कवी व रसिक उपस्थित होते.
आज-काल पर्यटनाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. कासची फुले हा तर पर्यटकांचा आवडता विषय आहे.तेव्हा वाढते पर्यटन,ढासळते पर्यावरण या विषयावर परिसंवाद झाला.
यामध्ये डॉ. मधुकर बाचूलकर, उमेश झिरपे ,आनंद सराफ , संध्या चौगुले आदींनी सहभाग नोंदवला.अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश ढाकणे (आयएएस कार्यवाह,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई) होते.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती आदिती भारद्वाज (आय एफ एस उपवनसंरक्षक) उपस्थीत होत्या.कार्यक्रमाचे संवाद व सूत्रसंचालन डॉ. संदीप श्रोत्री यांनी सफाईदारपणे केले.
व्यक्तिचित्रावर आधारित ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने लिखित, “वळणावरची माणसं” या अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.याचे सादरीकरण डॉ.आदिती काळमेख , वैदेही कुलकर्णी व चंद्रकांत कांबिरे यांनी सुरेख पद्धतीने केले. कार्यक्रमाची सूत्रसंकल्पना डॉ.राजेंद्र माने यांची होती. सदरच्या कार्यक्रमास प्राचार्य राजेंद्र शेजवळ व चपराक प्रकाशनचे प्रकाशक व लेखक घनश्याम पाटील उपस्थित होते. सायंकाळी सात वाजता, “लोकरंग शाहिरीचे” हा ओवी, अभंग,भारुड व पोवाडा या लोकसाहित्यावर आधारित कार्यक्रम झाला.संकल्पना आणि लेखन लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांची होती.याचे सादरीकरण योगेश चिकटगावकर ,डॉ.सुखदा खांडगे आणि कलावंत यांनी केले.ही महाराष्ट्र कला संस्कृती मंचची प्रस्तुती होती.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते उपस्थित होते.याचे संवादन शिरीष चिटणीस यांनी केले.