पोहेगांव प्रतिनिधी : माजी आ.स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरावती सोसायटीची उत्तरोत्तर प्रगती होत असून संस्थेने सलग तीन वर्षापासून मेंबर पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुली दिली आहे. संस्थेच्या जडणघडणीत विवेक कोल्हे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन अमरावती सोसायटीचे संस्थापक, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथे अमरावती विकास सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष देवराम गवळी होते.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष साहेबराव शिंदे, बाळासाहेब होन, ज्ञानेश्वर देशमुख ,सोमनाथ गायकवाड, विठ्ठल डुबे, विष्णुपंत डुबे ,हरिभाऊ कोल्हे ,चांगदेव कोल्हे ,दिगंबर गोसावी ,निवृत्ती दिघे, अदी सह सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहवाल विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे सचिव अशोक घेर यांनी केले. संस्थेची शंभर टक्के वसुली झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवराम गवळी, उपाध्यक्ष साहेबराव शिंदे सचिव अशोक घेर व शाखा निरीक्षक बाळासाहेब औताडे यांचा संस्थापक अरुणराव येवले यांनी सत्कार केला.सभासदांनी संस्थेचे कर्ज घेतले पाहिजे व त्या कर्जाची वेळेत कर्जफेड करून शासनाच्या मिळणाऱ्या योजनेचा व्याजाच्या परताव्याचा लाभ घेतला पाहिजेअसेही शेवटी येवले यांनी सांगितले. शेवटी सर्वांचे आभार अध्यक्ष देवराम गवळी यांनी मानले.