प्रतिनिधी; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कोणतेही कारण न सांगता महामंडळाच्या अध्यक्षांना विश्वासात न घेता अचानकपणे 61 कर्मचाऱ्यांची कपात केली होती यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. परंतु महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी याबाबत पत्रकाद्वारे खुलासा केला आहे .त्या पत्रकानुसार ते अध्यक्ष होण्यापूर्वी या महामंडळामध्ये मनमानी कारभार होता. लाभार्थ्यांना योग्य वागणूक मिळत नव्हती. अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवली जात होती त्यामुळे लाभार्थी वंचित राहत होते. लाभार्थ्यांची दिशाभूल केली जात होती. योग्य वेळेत ऑडिट होत नव्हते आणि याबाबतची सर्व जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे असताना सुद्धा ते काम करत नव्हते. यामुळे अध्यक्षांनी जिल्हा व मुख्य कार्यालय स्तरावर अधिक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आले होते. परंतु व्यवस्थापकीय संचालक यांच्या कामातील अनियमित्ता संचालक मंडळाच्या बैठकीत उघड केल्यामुळे मराठा समाजाचा राज्य सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक 61 कर्मचाऱ्यांची कोणतीही कारणे न देता अचानक कपात केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांची तातडीने इतर विभागामध्ये शासनामार्फत बदली करून महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यक्षम अभ्यासू अशा अधिकाऱ्याची नेमणूक करून कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्याची मागणी अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे. लवकरच या महामंडळातर्फे एक लाख उद्योजक हलाभार्थ्यांचा टप्पा गाठणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.