आई-वडिलांना सांभाळा, अन्यथा वारसा नोंद रद्द करण्यात येईल; कोल्हापुरातील माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय

0

कोल्हापूर : आपल्या मुलांना लहानाचे मोठं करण्यासाठी, त्यांचे चांगले पालनपोषन करण्यासाठी आई-वडिलांचे  आयुष्य खर्ची होते. मात्र तीच मुलं मोठी झाली की आई-वडिलांच्या वृद्धापकाळात त्यांना वाऱ्यावर सोडतात. किंवा त्यांच्या काठीचा आधार बनत नाहीत. अशी अनेक उदाहरणे किंवा घटना घडताहेत. हाच विचार करत कोल्हापूरमधील माणगाव ग्रामपंचायतीने एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वंत्र कौतूक होत असून, सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
               अन्यथा वारसात बेदखल

दरम्यान, आई-वडिलांना सांभाळा, त्यांची काळजी घ्या, अन्यथा वारसा नोंद रद्द करण्यात येईल. अशा पद्धतीचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. शिवाय नवीन वारसा नोंद करताना देखील आई-वडिलांची काळजी घेईल, तसे न केल्यास कारवाईस पात्र राहील. असे प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेतले जाणार आहे. असं या ग्रामपंचायतीन म्हटलं आहे.

वीज, पाणी खंडित होणार

दुसरीकडे जी मुलं आपल्या आई-वडीलांच सांभाळ करणार नाहीत, अशा मुलांच्या घरातील वीज, पाणी या मूलभूत सुविधा देखील न पुरवण्याचा निर्णय माणगावच्या ग्रामपंचायतीने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माणगावला खूप मोठा इतिहास आहे. याच गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगाव परिषद घेतली होती. त्यामुळे गावाला सामाजिक सुधारण्याची परंपरा आहे. या निर्णयामुळे चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या मुलांना चाप बसेल, उतार वयामध्ये कुणीही आपल्या आई-वडिलांना दूर करणार नाही. यासाठी या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. असं या गावचे सरपंच, राजू मगदूम यांनी सांगितल आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here