आगामी निवडणुकांत मराठा समाजाची वेगळी ताकत दाखवून देण्याचा साताऱ्यात ठराव

0

म्हसवड : भाटकी, ता. माण या ठिकाणी सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकामध्ये मराठा समाजाची वेगळी ताकत दाखवून समाजाच्या न्याय, हक्कासाठी समाज एकसंघ ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
या बैठकीस माण तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्रीकांत कट्टे, गणेश काटकर, घोडके, आप्पासाहेब देशमुख, रवी कदम काळचौंडी गावचे सरपंच भाऊ माने, प्रसाद माने, वडजल चेअरमन सुभाष काटकर, रंगराव काटकर, अजित शिर्के पाटील, नामदेव शिर्के, सुभाष पवार, अंकुश शिर्के, शिवाजी शिर्के, राहुल देवकर, शरद शिर्के, तानाजी शिर्के, प्रकाश शिर्के, कैलास शिर्के, सागर शिर्के, ब्रम्हदेव शिर्के आदी प्रमुख उपस्थित होते.

श्रीकांत कट्टे म्हणाले, आपल्यातील वा आपल्याजवळील काही मंडळी आपल्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या तोंडावर करतील, मात्र, सावध रहावे. आजपर्यंत राजकीय मंडळी निवडणूक आली की पाणी प्रश्नाचे भांडवल करतात. आपल्यातच फुट कशी पडून आपल्या एकीला तडा लावतात. त्यांच्या भुलथापांना समाजाने बळी पडु नये. माण तालुक्यातला मराठा हा आपल्या न्याय हक्कासाठी यापुढे लढेल कोणत्याही राजकीय नेत्याला भीक घालणार नाही. इतर विकासापेक्षा मराठा समाजाला स्वतःचा विकास महत्त्वाचा आहे, अशी भूमिका सर्वानुमते घेण्यात आली.

या बैठकीला सोहम शिर्के यांची विशेष उपस्थिती असल्याने बैठकीला युवकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. सर्व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. यापुढे माण तालुक्यातला मराठा एकच असेल कुठे अन्याय झाला तरीसुद्धा मराठा समाज
एकत्रित दिसेल अशी भूमिका घेण्यात आली. तसेच उद्योग व्यवसायामध्ये प्रत्येक युवक हा क्रांती घडवेल, असाही या वेळेला ठराव करण्यात आला.
भाटकी – मराठा समाजातील युवकांच्या बैठकीप्रसंगी श्रीकांत कट्टे ,गणेश काटकर व मान्यवर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here