आघाव पोलिस आत्महत्ये प्रकरणी अटक करण्याऐवजी अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी राहुरी पोलिसांचा खटाटोप 

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील पोलिस हवालदार भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्येनंतर पेालिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल होऊनही अद्यापी संबंधितांना अटक झालेली नसल्याने आघाव कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे.उलट आरोपींना अटकपुर्व जामीन मिळून देण्यासाठी राहुरी पोलिसांचा खटाटोप सुरु असल्याचे बोलले जात आहे. खाकी वर्दीसाठी आयुष्य खर्च करूनही पोलिसच पोलिसांना न्याय देत नसेल तर खाकी वर्दीची विश्‍वासार्हता राखणार कोण? असा प्रश्‍न आघाव कुटुंबियांच्या नातलगांनी केला आहे.

            मृत पोलिस कर्मचारी आघाव यांचा मुलगा प्रेमकुमार भाऊसाहेब आघाव यांनी फिर्याद देत आरोपी स.पो. नि. नरेंद्र साबळे,सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रामभाऊ निमसे, एक महिला पोलिस कर्मचारी व भाऊसाहेब शिवाजी फुंदे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच 10 लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे हे तपासी अधिकारी असून त्यांनी तात्काळ आरोपींना पकडण्यासाठी पथक  रवाना केले असल्याचे सांगितले. परंतु आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. अकोले तालुक्यातील राजूर पोलिस ठाण्यात आघाव यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा हा खोटा असल्याचे सांगूनही आघाव यांना कोणीही न्याय दिला नाही. प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे गरजेची होती. परंतु त्याउलट आघाव यांनाच त्या प्रकरणात मानसिक त्रास देण्यात आला. खंडणी मागितल्याचे सुसाईड नोट मध्ये खुलासा झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून तडकाफडकी अ‍ॅक्शन होणे गरजेची होती. पोलिस हवालदार आघाव यांच्या आत्महत्येनंतरही पोलिस प्रशासनाने घेतलेले शांततेचे धोरण पाहता दाल मे कुछ काला है अशी चर्चा दबक्या आवाजात होऊ लागली आहे.

               दरम्यान, आघाव यांच्या हत्येनंतर बीड येथील एका माजी पोलिस हवालदार नामदेव लोंढे यांनी सोशल मीडियामध्ये आपली प्रतिक्रीया देताना वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी आघाव यांच्या विरोधात एकाच प्रकरणाची एकाचवेळी दोन आदेशाच्या माध्यमातून चौकशीचे बेकायदेशिर दोन आदेश काढले, तसेच आघाव यांना विभागिय चौकशीसाठी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्र देण्यासाठी केलेेली हेळसांड, औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये विभागिय चौकशी विरोधात अपील केले होते. उच्च न्यायालयाने मॅट मध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक यांना प्रकरणाबाबत आपले मत मांडण्यास सांगूनही त्यांनी मॅट मध्ये हजेरी दिली नाही, उच्च न्यायालयाने मॅट मध्ये सुनावणी सुरू असताना पोलिस प्रशासनाने कोणताही निर्णय घेऊ नये असा आदेश दिला. परंतु पोलिस प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत आपले निर्णय घेतले. निवृत्त पोलिस कर्मचारी लोंढे यांनी पोलिस प्रशासनाच्या भुमिकेबाबत शंका व्यक्त केली आहे.

             अकोल परिसरात आघाव प्रकरणासंदर्भात कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. त्या प्रकरणाकडेही पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिस वर्दीवर व पोलिस ड्युटीवर असतानाच आघाव यांनी आत्महत्या करीत न्यायाची मागणी केली आहे. जीवंतपणी न्याय न मिळाल्याने मृत्युनंतर तरी स्व. आघाव यांना न्याय मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

चौकट

—-

पोलिस असूनही पोलिसाला न्याय मिळत नाही- प्रेम आघाव

——

माझे वडीलांनी पोलिस विभागात काम करताना आम्हाला कधीच वेळ दिला नाही. मला ड्यूटी महत्वाची आहे असे सांगत नेहमी कामाला महत्व दिले. पोलिस दलात असूनही कोणत्याही पोलिसांनी त्यांना साथ दिली नाही. आत्महत्येनंतरही ते पोलिस असतानाही कोणत्याही पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही उलट आरोपींना अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केले आहे.तपासी अंमलदार यांनी आरोपी शोधण्यासाठी कागदावर जे पथक नेमले ते पथक राहुरीतच दिसते. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी कोणताच पोलिस गेला नाही . याची खंत मृत आघाव यांचा मुलगा प्रेम आघाव याने प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केली.

——-

चौकट

आरोपी फरार झाल्यानंतर गुन्हे दाखल

—–

सकाळी 9 च्या सुमारास आत्महत्येचा प्रकार समोर आला. मृत पोलिस कर्मचारी आघाव यांनी सर्वांना व्हॉट्रसअ‍ॅपद्वारे चिठ्ठी पाठवली. चिठ्ठी मिळताच गुन्हे दाखल करून आरोपींना पकडणे गरजेचे होते. परंतु पोलिस प्रशासनाने दिरंगाई करीत आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप  मृत आघाव यांचे कुटुंबिय व नातेवाईकांनी केला. 

चौकट 

तपासी पोलिस निरीक्षक मोबाईल घेत नाही. 

         प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी नात्याने आघाव पोलिस कर्मचाऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केले.यासंदर्भातील तपासाची प्रगती व आरोपींना अटक झाली का?याची माहिती घेण्यासाठी मोबाईलवर फोन काँल केला असता पोलिस निरीक्षक  प्रताप दराडे यांनी काँल रिसीव्ह केलाच नाही. राहुरी पोलिस ठाण्यातुन आरोपींना पुर्णपणे सहकार्य मिळते की काय ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here