सातारा/अनिल वीर : जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभेतर्फे वर्षावास सुरू होता. त्याचा अश्विन पौर्णिमेस रविवार दि.९ रोजी ठिकठिकाणी सांगता समारोह आयोजित करण्यात आलेला आहे.
महाविहार, कराड (झिम्बरेवस्ती) दुपारी १२ वा.आयोजन करण्यात आले आहे.तेव्हा ज्या गावांत वर्षावास प्रवचन मालिका घेतली होती. तेथील सर्व महिला, पुरुष,युवक,युवती तसेच इतर सर्व गावांतील उपासक – उपासिका यांनी सफेद वस्त्रात वेळेवर उपस्थित रहावे.यावेळी बौद्धचार्य, माजी श्रामनेर, केंद्रियशिक्षक, शिक्षिका ,सर्व पदाधिकारी, हितचिंतक यावेळी उपस्थित राहणार आहेत.असे आवाहन जिल्हाध्यक्ष व्ही.आर.थोरवडे,बी.जे.माने (तालुकाध्यक्ष- कराड),यशवंत अडसूळे (सरचिटणीस), संजीवन लादे (कोषाध्यक्ष), राजाराम पाटणकर (संस्कार उपाध्यक्ष), विश्रांती भंडारे आदींनी आवाहन केले आहे.