सातारा : दीपलक्ष्मी पतसंस्था व माय बिट्स् कराओके स्टुडिओ प्रस्तुत, “तू तेंव्हा तशी” या गीत मैफिल कार्यक्रम शनिवार दि.२२ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सायंकाळी ५।। वा.येथील दिपलक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून संजय दीक्षित,दिलीप चरेगावकर, राजेंद्र सप्रे,सुरेखा शेजवळ, अनिल वाळिंबे,काका पाटील व शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन डॉ. लियाकत शेख यांचे असून निवेदन चित्रा भिसे करणार आहेत.सदर गीत मैफिलीमध्ये वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित,ममता नरहरी, चित्रा भिसे ,कला चंद ,सारिका हेंद्रे प्रा.राजेंद्र कुमार निकम, डॉ. लियाकत शेख, गणेश शिंदे, व जतीन शहा हे गायक कलाकार आपली सुमधुर गीते सादर करणार आहेत.