कु.दामिनी ची दिल्लीतील राजपथावर एअरफोर्स “परेड कमांण्डर” म्हणून निवड.
बीड/प्रतिनिधी
खो-खो वर्ल्डकपवर कु.प्रियंका इंगळे या बीडकर कन्येनं आपला ठसा उमटविला आहे.आता आणखी एका बीडकर सुकन्येनं सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करून बीडचे नाव देशभर रोशन केले आहे.बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील देवडी गावची मुळ रहिवासी असलेली कु.दामिनी दिलीप देशमुख हीची 26 जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या परेडसाठी “परेड कमांण्डर” म्हणून निवड झाली आहे. कु.दामिनी एअरफोर्स मध्ये पायलट म्हणून देशसेवा करीत आहे. परेडसाठी कमांडर म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा बहुमान आहे.. ती संधी कु.दामिनीला मिळाली याचा देशमुख देवडीकर कुटुंबीय आणि तमाम बीड जिल्ह्याला व महाराष्ट्राला नक्कीच अभिमान आहे. कु.दामिनीचे वडिल न्या. दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे चँरिटी कमिशनर म्हणून नुकतेच निवृत्त झाले आहेत. कु.दामिनी ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची पुतणी आहे. खरंच कु.दामिनी चा आम्हा बीड करांना सार्थ अभिमान आहे. बीड करांच्या वतीने डोंगरचा राजा च्या माध्यमातून कु.दामिनीचे मनापासून अभिनंदन. काहींनी बीडचे नाव देशभर बदनाम केले आहे. मात्र बदनामीचा हा शिक्का पुसून काढण्यासाठी बीडची युवाशक्ती पुढे येत आहे हे पाहून निश्चित सर्वांना आनंद होत आहे. बीड मध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. नकारात्मक बातम्यांना जास्त प्रसिध्दी मिळते. अशा वातावरणात कु.प्रियंका असेल किंवा कु.दामिनी यांचं कर्तृत्व अधिक उठून दिसते.
बीड जिल्हा केवळ ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा नाही तर कर्तृत्ववान युवकांचाही जिल्हा आहे. ही नवी ओळख आता निर्माण होत आहे.याचा निश्चितच आपल्या सर्वांना आनंद आहे.
बीड जिल्हा हा विविध संघटनेच्या, विविध खेळांच्या आणि वेगवेगळ्या विधायक कार्याच्या बाबतीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. जेंव्हा एखाद्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर पडतात. त्या घटनेची पायाभरणी ही बीड जिल्हातच असते. परंतु गेल्या काही महिन्यापासून मस्साजोग प्रकरणात सरपंचाची निघूर्ण हत्या आणि राजकारण्यांना गोवण्याचा एक कल्मी अठ्ठाहास. यामुळे सतत केवळ बीडचं अस्स…अन् बीडचं तसं… अमक्याचे असं..व तमक्याचं तसं..म्हणून बदनामीच्या कटहारात केवळ बीड जिल्ह्याला उभं केलं जात आहे.
या दोन्ही घटनेच्याही पलिकडे जाऊन सकारात्मक दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे.
बीड जिल्ह्यातला अतिमागास म्हणून गणाला जात असलेला तालुका म्हणजे वडवणी तालुका या तालुक्यातील छोट्याशा देवडी गावची मुळ रहिवासी असलेली कु.दामिनी दिलीप देशमुख ही कन्या फ्लाइंग ऑफिसर म्हणून देशाच्या वायुदलात अतिउच्चपदी विराजमान झालेली आहे.
बीड जिल्ह्यातील महिला मुली राजकिय, सामाजिक ,वैद्यकिय अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. कु.दामिनी देशमुख या मुलीने एका नविन क्षेत्रात पदार्पण करून बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करून आपल्या कर्तुत्वाची मुद्रा ,पताका फडकवण्याचे अभिनव कार्य याच दामिनीने केलेलं आहे. व करत आहे. दामिनीने जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर सन 2019 मध्ये देशपातळीवर घेण्यात आलेल्या कॉमन अॕडमीस्ट्रेट या खडतर परीक्षेत देशभरातील दिड लाख उमेदवारामधून गुणवत्ता यादीमध्ये येत अभिनव व दैदिप्यमान यश संपादन करून तिची एअर फोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे या दामिनीने आपल्या आवडत्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी शासनाची मीळत असलेल्या उच्च शिक्षणासाठीची शिष्यवृत्तीही सोडून दिली.
ही बीड जिल्हयाची दामिनी केवळ फ्लांईग ऑफिसरच नव्हे तर अश्वारोहन, कराटे, योगा, धनुर्विद्या, रायफल सुटिंग, तसेच खो-खो, व्हॉलिबॉल अशा विविध उपक्रमात अग्रेसर आहे. ती कराटे खेळात ब्लेक बेल्टमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. अशा या दामिनीची 26 जानेवारी 2025 मध्ये होत असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहना प्रसंगी विमानातून पुष्पवृष्ठी करण्यासाठी या बीड जिल्ह्याच्या कन्येची निवड म्हणजे अखिल बीड जिल्ह्याची गर्वाने मान ताठ होईल अशा प्रकारचा हा प्रसंग.
बीड जिल्हयालाची बदनामी थांबविणे ही गरज होऊन बसलेली आहे. आपल्या भारताचे महामहिम राष्ट्रपती व प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन होत असताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याचे बीड जिल्हयातील दामिनीला सद्भाग्य मीळत असेल तर बीडचा…झालाय, बीडचा..होईल.! बीडचे नावच..नामशेष होईल अशा वल्गना करणाऱ्यांना या गोष्टी कोण लक्षात आणून देईल.!!
बीड जिल्ह्याच्या बाबतीत दुसरी उव्लेखनिय घटना म्हणजे अति ग्रामीण खेड्यातील कळमअंबा तालुका केज येथील कु. प्रियंका इंगळे ही उच्च माध्यमिकमध्ये शिक्षण घेणारी कु. प्रियंका भारतीय खो-खो संघाचे कॅप्टन म्हणून नेतृत्व करते. एवढेच काय या नेतृत्वाची झलक अख्या देशाला दाखवते. तिने तिच्या नेतृत्वात खो-खो, मध्ये विश्वचषक जिंकून इतिहास घडवला.असे अष्टपैलू हिरे बीड जिल्ह्याचे नाव रोशन करत आहेत आणि आपण मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी बीडला…शेजारी बसवताय हे आपण केव्हा संपवणार.! याचा विचार करण्याची वेळ आली आहे. दामिनी देशमुख हिचं करावे तेवढे कौतुक कमीच आहे..