उरण दि ३ ( विठ्ठल ममताबादे ) पागोटे ग्रामपंचायतीने गावातील अबालवृद्धांचे आरोग्य तंदुरुस्त रहावे यासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्याचे काम हाती घेतले, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप,कचरा कुंडीचे वाटप, रहिवाशांना पाणी पुरवठा करणाऱ्या पम्प हाऊस येथे सोलर पॅनलचे अनावरण आणि आदिवासी कुटुंबांना १५ टक्के अनुदानातून संसार उपयोगी साहित्य पुरविणे या सारख्या कामाचे आयोजन नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर हाती घेतले आहे.याचा निश्चितच आम्हाला अभिमान वाटत असून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने एकदिलाने काम केले तर आपलं गाव आदर्श गाव म्हणून उदयास येण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी व्यक्त केला.
१९८४ सालच्या गौरवशाली शेतकरी लढ्यातील ५ हुतात्म्यांना अभिवादन करून २ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर पागोटे ग्रामपंचायतीने तेरणा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गावात आरोग्य शिबीर, ग्रामपंचायत मार्फत कचरा कुंडीचे वाटप, ग्रामपंचायत मार्फत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप,१५ टक्के अनुदानातून आदिवासी कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य पुरविणे आणि पम्प हाऊस येथे सोलर पॅनलचे अनावरण या सारख्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन पागोटे ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी ( दि २) करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच पागोटे गावातील हुतात्म्यांना अभिवादन करून करण्यात आले.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी समीर वाठारकर हे बोलत होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील व उपसरपंच करिश्मा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुजित तांडेल,अधिराज पाटील,समूध्दी तांडेल, सुनीता पाटील, सतीश पाटील,मयुर पाटील, सोनाली भोईर,ग्राम पंचायत अधिकारी अनिता म्हात्रे,ग्राम विकास मंडळ अध्यक्ष प्रकाश भोईर, उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील, सेक्रेटरी शैलेंद्र पाटील, महेश पाटील, तेरणा रुग्णालयाचे डॉ रविंद्र कदम, डॉ अजित निळे, डॉ मनोज सकपाळ, डॉ अजित जाधव सह इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी ग्रामस्थांनी आरोग्य शिबीराच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.