आदर्श माता जीवन गौरव पुरस्काराने सौ दुर्गाताई तांबे सन्मानित

0

पुणे : धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या वतीने संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा सौ दुर्गा ताई तांबे Durgatai Tambe यांचा आदर्श माता जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . राज्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृतावाने ठसा उमटवीनाऱ्या मान्यवरांचा धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पुणे Dhorde patil trust pune यांच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .

या मध्ये संभाजीराव शिंदे मुख्य न्यायाधीश (निवृत्त) राज्यस्थान हायकोर्ट, पद्मश्री परशुराम खूने,गडचिरोलीत,यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड I A S (यशदा महासंचालक पुणे) यांच्या हस्ते धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आयोजीत, आदर्श माता सौ. दुर्गाताई सुधीर तांबे व श्रीमती कमल जयकुमार मोरे, ज्येष्ठ विधीज्ञ जीवनगौरव पुरस्कार सखाराम कोळसे पाटील व प्रताप राव परदेशी, विशेष कार्य जीवन गौरव पुरस्कार सुभाष देशमुख व माजी खासदार उत्तमसिंग पवार, विशेष कार्य गौरव पुरस्कार व अवॉर्डस् ऑफ ऑनर पुरस्कार अशोक काकडे व भानुप्रताप बर्गे,  विशेष कार्य गौरव पुरस्कार गणेश निबे, निखिल चिटणीस व रेश्मा पुणेकर यांना 2022-2023 चा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.. तसेच रमेशराव निवृत्ती धोर्डे पाटील सिनियर काँनसिल बॉम्बे हायकोर्ट छत्रपती संभाजीनगर व विलासराव जगन्नाथ धोर्डे पाटील जिल्हा न्यायालय छत्रपती संभाजीनगर, यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला .

यावेळी ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त, आत्महत्या ग्रस्त  शेतकऱ्यांचा कुटुंबीयांना व आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. शुक्रवार दिनांक 27-10-2023 रोजी सायंकाळी 5-00 वाजता.  स्थळ:- बालगंधर्व रंगमंदिर जंगली महाराज रोड पुणे येथे हा कार्यक्रम पार पडला. राज्यातील अनेक जिल्ह्यातील, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणास लागणारे सर्व पुस्तक, स्कूल बॅग, बुट, ड्रेस, रजिस्टर तर, परभणी (मानवत तालुका, इरळद) शाळेतील व गावातील भूमिहीन  व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना साडी चोळी, तर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, बुट, रजिस्टर, कपडे, पेन, पेन्सिल, आर्थिक मदत करून, त्या सर्व जिल्ह्यातील महिलांना व विद्यार्थ्यांना  मदत करण्यात आली.तसेच  जालना जिल्ह्यातील अनाथ व भूमिहीन व आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील सदस्यांना, महिलांना जीवन उपोयोगी साहित्य वाटप केले, व  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आर्थिक मदत करण्यात आली. इतर काही  जिल्ह्यातील विद्यार्थी व महिला यांना सुध्दा मदत करणयात आली….ट्रस्ट चे सेवेचे हे10  वे वर्ष असून असे अनेक वेळा राज्यातील इतर ठिकाणी नैसर्गिक आपत्ती किंवा इतर प्रतेक अडचणीवर मदत करून प्रसंगी त्या कुटुंबांना आर्थिक व सामाजिक, शैक्षणिक पाया भरणी करण्यासाठी धोर्डे पाटील चॅरिटेबल  कार्यरत असते. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आमदार सत्यजित तांबे, गोपाळ राजूरकर, इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here