नायगाव दत्तापूर येथे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता
बुलडाणा,(प्रतिनिधी )-
मेहकर येथून जवळच असलेल्या नायगाव दत्तपुर येथे दि.२१ नोहेंबर ते २८ नोहेंबर २०२४ पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर माउली संजीवन सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दि.२८ नोहेंबर २०२४ रोजी या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता पुरी भाजी महाप्रसादाचे वितरण करून करण्यात आली यावेळी मेहकर मतदार संघाचे फुले शाहू आंहेडकरी चळवळीचे समाजभिमुख नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्या हस्ते शेकडो भाविक भक्तांना पुरी भाजी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले,
आमदार सिद्धार्थ खरात यांनी संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात जाऊन माऊलीचे दर्शन घेतले,यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे, मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे,युवासेना प्रमुख ॲड. आकाश घोडे, डोनगाव सर्कल प्रमुख निंबाभाउ पांडव,नायगाव दत्तपुर च्या सरपंच आशा विलास गवई,श्याम निकम,रवी निकम, विलास गवई,किशोर दुतोंडे,दिलीप पाटील, ज्ञानू पाटील, सुरेश डव्हळे, रामदास निकम, रूपराव निकम यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते