आम्हीं दुरशेतकर गावाच्या नवीन नामफळकाचा अनावरण कार्यक्रम सोहळा झाला मोठ्या उत्साहात संपन्न !…

0

उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) :आज काल शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली गावंच्या  – गावं उध्वस्त केली जात आहेत आणि हे सर्व पाहता ” माझा गाव माझा अभिमान ” ! ही संकल्पना उराशी बाळगत आज पर्यंत उरण ,पनवेल , पेण सोबतच रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांना त्यांच्या गावांच्या नावांचे बोधचिन्ह अर्थात विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नावांचे नवीन नामफलक बनवून देण्याचं औदार्य ज्यांच्या मनाच्या मोठेपणातून साकारलं गेलं असे दानशूर व्यक्तिमत्त्व  केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्परुपी औदार्यातून आज पेण तालुक्यातील दुर शेत गावात आम्हीं दुरशेतकर या नावाचं  विद्युत रोषणाईने चमकणारे नूतन नामफलक  बनऊन देण्यात आले त्या नूतन नामफलकाच्या अनावरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने दुरशेत गावात करण्यात आले. आज पर्यंत उरण,पनवेल,पेण तालुक्यातील अनेक गावांच्या नावांच्या नामफलकांचे लोकार्पण करण्यात आले.

      राजू मुंबईकर यांनी अनेक सामाजिक कार्यांच्या माध्यमातून समाजात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटविला आहे आणि ह्याच सामाजिक संस्कारांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या औदार्यातून आज हे सुंदर कार्य साकारलं गेलं !  खऱ्या अर्थाने हे नामफलक लागण्या साठी उरण तालुक्यातील सारडे गावचे सामाजिक कार्यकर्ते समिरजी पाटील यांनी केलेल्या मागणीच्या विनंतीला मान देतं दुरशेत गावांच विद्युत रोषणाईने चमकणारे नामफलक बनवून देण्याचं प्रेरणादायी कार्य साकारण्यात आले ह्या कार्यक्रमाच्या अनावरण सोहळा कार्यक्रमा प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत अगदी जंगी पद्धतीने करण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना राजू मुंबईकर  यांनी म्हटलं की विकासाच्या नावाखाली उध्वस्त होणारी गावं पहिली आणि माझा गावं माझा अभिमान ही संकल्पना मनात आली आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प केला त्यातूनच आज पर्यंत अनेक गावांच्या नावाचे नामफलक ( बोधचिन्ह ) बनऊन देण्यात आले.

   

केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या सौजन्याने साकारलेल्या दुरशेत ह्या गावांत नवीन नामफलकाच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहलजी पालकर,कॉन संस्थेचे वेश्वी शाखा उपाध्यक्ष सुरेंद्रजी पाटील,खरोशी गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते  महेशदादा घरत सोबतच  दुरशेत ग्राम पंचायतीचे सरपंच शरथजी गावंड, उपसरपंच सूरजजी भोईर,माजी उपसरपंच शरदजी गावंड, ग्रा.पं.सदस्य नंदिनीताई गावंड,भाग्यश्रीताई गावंड,रेश्माताई गावंड, शेवंतीताई गावंड, संगिताताई गावंड, रणजित गावंड, सुश्मिताताई गावंड , अदितीताई पाटील, ऋषिकेश गावंड , दिपेश गावंड, जयेश म्हात्रे उरण- सारडे गावचे युवा सामाजिक समिर पाटील आणि दुरशेत गावांतील ग्रामस्थ आणि महिला भगिनि मोठया प्रमाणात उपस्थित होते.ह्या सर्वांच्या उपस्थितीत ह्या विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नवीन नामफलकाचा अनावरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here