उदय कुलकर्णी;कोल्हापूर :* एका पानपट्टीच्या दुकानाजवळ सुमारे पस्तीस वर्षाचा एक तरुण उभा होता सडपातळ बांधा केसांचा कोंबडा फिरवलेला अंगावर स्वच्छ व फॅशनेबल कपडे,तोंडात गुटख्याचा तोबरा भरलेला असा त्याचा अवतार होता.त्या तरुणाला सहज विचारले :* त्यावर तो तरुण म्हणाला आम्हाला आमचं सरकार सर्व काही देतंय मग आम्ही काम धंदा करून कमवायची गरजच काय ?
आम्ही कुणाच्या बाचे खातोय ?आम्हाला आमचे माय बाप सरकारच देतय आणि तो आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच.
*काही नोकरी धंदा करून कमवत का नाहीस ?*
*दिवसभर दारू पिऊन गुठका खात थुंकत असतोस !*
*तो बोलला : माझी मर्जी !*
*त्याला विचारण्यात आलं : लग्न झालंय का ?*
*तो बोलला : झालंय.*
*मी विचारले : कसं केलं?*
*तो म्हणाला : मुख्यमंत्री आदर्श विवाह योजनेअंतर्गत श्रम कार्ड द्वारे तीस हजार मिळतात आणि आंतरजातीय कन्यादान योजनेतून अडीच लाख रुपये मिळाले.*
*मी म्हटलं मग मुलं होतील त्याकरिता तरी कमवावं लागणारच ना?*
*तो म्हणाला नाही…! “जननी सुरक्षा” योजनेत प्रसूती मोफत असतेच शिवाय पंधराशे रुपयांचा धनादेश मिळतोच आणि “श्रम कार्ड” योजनेत “भगिनी प्रसूती योजनेद्वारे” वीस हजार रुपये मिळतात ते वेगळेच.*
*मी म्हटलं : मुलांच्या शिक्षणाकरता तरी कमावशील की नाही ?*
*गुटख्याची पिचकारी मारत तो म्हणाला, त्यांच्या करीता सरकारतर्फे शिक्षण, गणवेश, वह्या पुस्तके आणि जेवण मोफत मिळतेच आहे. शिवाय मुख्यमंत्री श्रम कार्डद्वारे दर वर्षी पैसे सुद्धा मिळतात.*
*आणि जेव्हा मुलगा महाविद्यालयात जाऊ लागेल तेव्हा BPL द्वारे मोफत प्रवेश आणि स्कॉलरशीप सुद्धा मिळते. मग टेंशन कशासाठी घ्यायचं !आणि कामधंदा कशासाठी करायचा ?*
*मी विचारलं, घर खर्चाचं काय ?*
*तो म्हणाला, लहान मुलीला सरकारकडून सायकल मिळाली आणि मुलाला लॅपटॉप मिळालाय.*
*आईवडिलांना वृद्धावस्था पेन्शन मिळतेय आणि दोन व तीन रुपये किलो दराने गहू तांदूळ मिळतोयच.*
*मी म्हणालो, अरे आईवडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी तरी कमव.*
*तो म्हणाला, “मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत त्यांना पाठवलं सुध्दा!*
*मी म्हटलं, त्यांच्या आजारपणासाठी तरी कमव !*
*तो म्हणाला, “आयुष्यमान कार्ड” द्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत अषोधोपचा मिळतात. मग त्याची चिंता कशाला करू*
*मला त्याचा राग आला. म्हटलं, आईवडिलांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी कमव.*
*तो म्हणाला, अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी लाकडं सरकार मोफत देतंय.*
*मी म्हटलं, अरे मुलांच्या विवाहाकरीता तरी कमव.*
*तो हसला आणि म्हणाला, पुन्हा तोच प्रश्न !*
*जसा माझा विवाह झाला तसाच त्यांचाही होणार!*
*मी म्हटले मित्रा, मला एक गोष्ट सांग. तू एवढे सुंदर कपडे कसे काय वापरू शकतोस ? तो म्हणाला, सरकारी जमिनीवर ताबा घे, घर बांध, कर्ज घे आणि घर विकून जमिन कब्जात घे.*
*तुमच्या सारखे लाखो लोक आमच्या सारख्यांकरीता टॅक्स भरत आहेत. शेतकरी कष्ट करून धान्य पिकवत आहे .आणि सरकार ते धान्य खरेदी करून आम्हाला मोफत देत आहे. मग आम्ही कशाला कामं करायची ?*
अशा प्रकारे मताच्या जोगव्यासाठी रोज नवनवीन योजना सरकार काढते आहे आणि देशाचा राज्याचा खर्च भागेना तर कर्ज काढून का होईना पण जनतेसाठी विविध योजना राबवल्या जातात कारण अशा योजना राबवल्या नाही तर आमच्या मायबाप सरकारला मताचा जोगवा कसा मिळणार ?वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेऊन जनता चैन करत आहेआणि त्यातूनच श्रम करण्याची आज कोणत्याही तरुणांची अथवा तरुणींची मानसिकताच शिल्लक राहिलेली नाही.एकीकडे सरकार आत्मनिर्भर भारत ही घोषणा देत असताना या देशातील असंख्य तरुण आणि तरुणींना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कष्ट करण्याच्या उमेदीवरच घाऊ घालण्याचे काम सत्ताधारी राजरोसपणे करत आहेत असे निदर्शनात येते
कष्ट करावे आणि स्व कष्टाचे खावे हे आजच्या नव्या पिढीला हे सरकार समजूच देणार नाही मग यात आमच्या तरुण पिढीचा तरी दोष काय ?
बाकी काही नाही बघा, “आंधळा राजा आणि भोंगळी प्रजा ” असा सारा कारभार सुरू असल्याचे जनसामान्यातून पारावर चर्चा रंगताना दिसत आहेत