आय ..(जिजाऊ)..
प्रत्येकां वाटेअसावी
जिजाऊ समानमाय
घरोघरी जन्मा यावे
जाणते राजेशिवराय
कशी हवी स्निग्धता
शिकविते सारे साय
धगधग अग्नी ज्वाळ
स्वतः सोसते रे हाय
घडवी शिखर दर्शन
वंदावे ते पावन पाय
आऊ हात परिसाचे
सुवर्ण झळाळू जाय
जन्मास घालतो देव
शतकांत अशी माय
स्वराज्य रयतेसाठी
कर्तृत्वां तिचे न ठाय
कधी बनते वाघीण
कधी स्नेहाळ गाय
अनोखे रूप तेजाळे
इतिहासही गुण गाय
मातेच्या वाटे चालेलं
पुत्रही तसाचं हवायं
स्वाभिमान करेजागा
शिकवे सक्षम जगायं
आऊ जयकारा ..
तुम्हांमुळे माॅं साहेब
स्वराजोत्सव साजरा
इतिहास देत राहीलं
सदैव मानाचा मुजरा
मराठी मातीत पाही
तो स्वराज्याचा चेहरा
तावून सुलाखून तूचं
जमवी एकेक मोहरा
कठोर शिक्षण दिधले
आपल्या प्रिय लेकरा
गरूड भरारी माराया
स्वप्न जागवले पाखरा
भगवा सर्वत्र फडकवू
मावळा झाला बावरा
मोगल निजाम बोलले
कुणीतरी यांना आवरा
मराठ्यांचे राज्य आले
स्वराज्यछान आकारा
जय भवानी शिवाजी
गाजला सर्वत्र पुकारा
आऊ साहेब आपल्या
विसरु कसे उपकारा
यावत चंद : दिवाकरो
हो आऊचा जयकारा
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..