देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यतील बारागाव नांदूर नवीन गावठाण येथील आशीर्वाद दूध संकलन केंद्राच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधुन दूध पुरवठादार शेतकऱ्यांना रिबेट,महिलांना पैठनी साडी व मिठाई वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार हे होते. याप्रसंगी आशीर्वाद दूध संकलन केंद्र संचालक खंडेराय बाचकर यांनी 3 महिन्या पूर्वी प्रारंभ केलेल्या व्यवसायाला एकूण 65 दूध उत्पादकांनी मोठे पाठबळ दिले. नवीन गावठाण हद्दीतील शेतकऱ्यांसाठी आशीर्वाद दूध संकलन केंद्र पर्वणी ठरल्याचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पवार यांनी सांगितले.
यावेळी दादासाहेब शिंदे, रतन तमनर, भाऊसाहेब बाचकर, महेश बेंद्रे, मंजाबापू बाचकर, अंकुश आघाव, गीताराम बाचकर, संतोष बोरुडे यांनी सर्वाधिक रिबेट घेतले. 1 लाख 10 हजार रुपये रिबेट व शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा देत पाठबळ देणाऱ्या 55 गृहिणींना उच्च दर्जाच्या पैठणी साडी व कुटुंबियांना मिठाई वाटप करून शेतकऱ्यांना दिवाळी सणाची भेट दिली. राजेंद्र गोपाळे, अंकुश आघाव,अनिल पवार, अशोक होडगर, लक्ष्मन बाचकर, समाजी बेंद्रे, शिवा पवार, पंढरीनाथ बाचकर, सुजित आघाव, संतोष बोरुडे, लक्ष्मण बाचकर, ज्ञानदेव बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, बंडू गोपाळे, डॉ. विलास गोपाळे, अमोल भालेराव,शिवा बाचकर, व इतर 150 जण समुदाय यांच्या उपस्थितीत शेतजाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बारागाव नांदूर माजी सरपंच सौ. जयश्रीताई गाडे, पंढु तात्या पवार, धनराज गाडे, युवराज गाडे, प्रा. इजाज सय्यद, ताराचंद गाडे , लखूनाना गाडे, महेश गाडे, वावरथचे ज्ञानदेव बाचकर, रामदास बाचकर, श्रीकांत बाचकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रभाकर गाडे, भाजप किसान मोर्चाचे कैलास पवार, दिलीप पवार, आदींची उपस्थिती होती. तसेच पोलीस उप निरीक्षक श्री. मंगेश बाचकर यांनी बारागाव नांदूर कृषिमध्ये पाहिलांदाच महिला दूध उत्पादकांचा पैठणी साड्या, मिठाई, रिबेट देऊन मोठ्या सन्मानाने गौरव केला असल्याचे गावकरी सांगत असून गावातील महिलांना पैठणी साड्या भेट देऊन भाऊबीज दिली असल्याचे महिलांनी मनोगत व्यक्त केले आहे.
तसेच आशिर्वाद दूध संकलन केंद्राचे आधारस्तंभ मंगेश बाचकर, यांनी दूध उत्पादकांना योग्य भाव देऊन, ज्या गावात जन्म घेतला त्या गावातील शेतकऱ्यांना भविष्यात गुजरात गोध्रा कंपनीशी संपर्कात राहून योग्य भाव देऊन न्याय देणार असल्याचा शब्द दिला आहे.