खर्ड्यात २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण..
जामखेड तालुका प्रतिनिधी :
कर्जत जामखेड मतदार संघातील जनतेची आमदार रोहित पवार यांनी पाच वर्षे सेवा केली आहे पुढची पाच वर्ष तुमच्यासह महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खर्डा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या रणभूमीवरून देताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. एक प्रकारे त्यांनी आमदार रोहित पवार यांना मंत्री करण्याचे सुतोवाच केले आहे. यावेळी होळकर यांची वंशज भूषण सिंहराजे होळकर, खासदार निलेश लंके, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंखे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार राहुल मोटे आदी उपस्थित होते.
काम करण्यासाठी तरुणांची साथ हवी आहे ही ताकद कोणाचा असेल तर ती रोहित पवारांमध्ये आहे त्यामुळे तुमची साथ रोहित पवारांना द्या असे आवाहन शरद पवार यांनी केले विकासाची व्हिजन असणारा नेता रोहित आहे कर्जत जामखेड मतदार संघाची त्याने महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विकास कमी करायला अक्कल लागते पण उभं केलेलं उध्वस्त करायला अक्कल लागत नाही रोहित पवार चांगले काम करत आहेत त्याला मदत करता आली नाही तर त्याच्या कामात खोडा घालू नका असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यावर टीका केली.
साडेचार वर्षात मतदार संघात राष्ट्रीय राज्य व ग्रामीण भागातील रस्त्यासाठी २७०० कोटी जलजीवन पाणीपुरवठा साठी ३०० कोटीचे जामखेडला पाणीपुरवठा १८० कोटी अशी अनेक कामे रोहित पवार यांनी मंजूर करून आणली आहेत असे पवार म्हणाले.
खासदार निलेश लंके म्हणाले की विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमदार रोहित पवारांनी कामे केले आहे असे अभ्यासून नियोजनपूर्वक काम करणाऱ्या नेत्यास राजाचा नेता म्हणून पाठविण्यासाठी आपली जबाबदारी आहे आ. पवार यांनी कोरोनाच्या काळात जनतेची काळजी घेतली मतदार संघात आरोग्य सेवा दिली. विरोधी आमदार कोरोना काळात स्वतःच्या घरात राहून फक्त झाडांना पाणी देत होता तो कसला भूमिपुत्र असा प्रश्न खासदार लंके यांनी व्यक्त केला. लोकसभेचा निवडणुकीत भाजपवाल्यांना भूमिपुत्र हा शब्द कसा आठवला नाही.
आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले की खर्ड्याच्या पावन भूमीत शेवटची लढाई आपण जिंकलो तसेच जगातील सर्वात उंच स्वराज्य ध्वज या ठिकाणी आपण उभा केला अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श घेऊन मी काम करीत आहे. शरद पवार यांनी मला कर्जत – जामखेड मतदार संघात लढण्याचे सांगितले मला जनतेने निवडून दिले मी आजपर्यंत जनतेचा सेवक म्हणून काम करीत आहे. विरोधक माझ्यावर सोन्याचा चमचा घेऊन आला आहे असा आरोप करतात ते काम करीत असताना कुठलाही भेदभाव करीत नाही माझ्या आईने बचत गटाच्या माध्यमातून ३१ कोटी रुपयांचा निधी बचत गटातील महिलांना मिळवून दिला आहे माझ्या वडिलांनी शेतकऱ्यांसाठी मदत केली आहे.
महाराष्ट्रात पुढील काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून विरोधकांनी अडवलेली एमआयडीसी पुढील काळात लवकरच सुरू करणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी केले. दत्ता वारे, भूषणसिंह होळकर यांचेही भाषण यावेळी झाले. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला प्रचंड संख्येने उपस्थित होत्या.