आ.सातपुते यांनी तालुक्यात येवून खरी माहिती घ्यावी,राडे यांनी गुन्हेगारी मोडीत काढली

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  

                   राहुरी तालुक्यात प्रथमच अधिकाऱ्यांच्या बाजुने जनता रस्त्यावर उतरली.आंदोलन पण झाले, माञ या आंदोलना संदर्भात एक क्लिप व्हायरल झाली.आंदोलनात कोण सहभागी होते.आमच्या मुलींची आब्रू पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनीच वाचविली आहे.हे आंदोलन सर्वसामान्य नागरीकांनी हाथी घेतले आहे. आ.सातपुते यांनी तालुक्यात येवून खरी माहिती घ्यावी. दराडेंची चौकशी करावी त्यात ते दोषी आढळले तर त्यांच्यावर निश्चित कारवाई करा असा सुर राहुरी फँक्टरी येथिल निषेध सभेत मनोगत व्यक्त करताना केला आहे.

           राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची तारांकीत प्रश्नावरुन उचलबांगडी करुन अन्याय झाल्याच्या निषेधार्थ राहुरी फँक्टरी येथिल डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकात येथिल व्यापाऱ्यांच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली.

           यावेळी शांती चौक मिञ मंडळाचे अध्यक्ष दिपक ञिभुवन यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले की,जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूर विभागात पोलिस उप अधिक्षक म्हणून काम केलेले आहे. राहुरी तालुक्यातील गुन्हेगारीची माहिती त्यांना आहे.दराडे यांनी गुन्हेगारी मोडीत काढली आहे.पोलिस सर्वसामान्यांचा आधार बनले आहे.आ.सातपुते यांनी राजकीय षडयंञाचा वापर करुन दराडे यांना दोषी धरले आहे.आ.सातपुते यांचा निषेध करण्यात येत आहे.असे ञिभुवन यांनी सांगितले.

          यावेळी साई आर्दशचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले की,एखाद्या अधिकाऱ्यांच्या बाजुने रास्तारोको होतो.तसा तालुक्यातील पहिलाच रास्तारोको आहे.जनता जागृत झालेली आहे.या अधिकाऱ्यांने तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढली आहे.आ.सातपुते यांनी स्वतःच्या तालुक्यातील प्रश्न सोडवावे.दराडे दोषी असेल तर निश्चित कारवाई करावी त्यास तालुक्यातील जनता आडवी येणार नाही.असे कपाळे यांनी सांगितले आहे.

         यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णू गिते,केदार चव्हाण,सोमनाथ किर्तने,भाऊसाहेब पगारे,सचिन साळवे आदींनी मनोगत व्यक्त करताना आ.सातपुते व गृहराज्यमंञी  शंभुराजे देसाई यांचा निषेध केला आहे.

           यावेळी माजी नगरसेवक अदिनाथ कराळे,ज्ञानेश्वर वाणी, विलास अल्हाट,सुरेश लोखंडे,दत्ता दरंदले,मनोज वाघ,बाळासाहेब पडागळे,मिनानाथ झावरे,अनिल चव्हाणआदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here