इंडियन मेडीकल असोशिएसन च्या वतीने मतदात्यांना घवघवीत सूट

0

मतदान करा सूट मिळवा – आयएमए

नांदेड प्रतिनिधी :

महापालिकेचे आयुक्त .डॉ.महेशकुमार डोईफोडे  यांना आयएमए च्या नांदेड शाखेच्या वतीने येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या  विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान जनजागृती आणी टक्केवारी वाढविण्यासाठी आयएमए  नांदेड च्या सहभागासाठी नुकतीच निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे   

यात आयएमए ने म्हटले आहे की येत्या २० नोव्हेंबेर बुधवार रोजी विधानसभा आणी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान जनजागृती आणी मंतदानाची टक्केवारी वाढविणे या करता आयएमए नांदेड च्यावतीने एक छोटासा प्रयत्न करण्यात येणार आहे यात लोकांच्या आरोग्या सोबत लोकशाहीचे सुद्धा आरोग्य जपणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो त्या करीता  दि २०/११/२०२४ बुधवार रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी जो रुग्ण मतदान केल्याची ओळख म्हणजे बोटाला शाई दाखवेल त्या प्रत्येक रूग्णाला डॉक्टरांकडून खालील सुविधा देण्यात येतील .

यात तपासणी फीस म्हणजेच ओ.पी.डी. फीस मध्ये ३०% सवलत तसेच  रेडीओलॉजी अंतर्गत येणाऱ्या सिटी स्कॅन, एमआरआय, एक्सरे , सोनोग्राफी , मॅमोग्राफी यासाठी २०% सवलत देण्यात येणार आहे’ तर  विविध प्रकारच्या पॅथॉलॉजी तपासण्यांसाठी ३०% सवलत  देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी मतदान करून आपली भारतीय लोकशाही आणखी सशक्त व मजबूत करण्यासाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयएमए नांदेडड चे अध्यक्ष डॉ प्रल्हाद कोटकर , सचिव डॉ राहुल लवहेकर यांच्यासह आयएमएच्या सदस्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here