राजन जोशी,पुणे : गोपीचंद पडळकर यांच्या हातातल्या या बेड्या त्यांनी दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्यासाठी टेंभू योजनेचे कार्यालय फोडले होते म्हणून तत्कालीन भ्रष्टाचारी काँग्रेस सरकारने घातल्या होत्या,सरकारला जेरीस आणायची धमक रक्तात असावी लागते,अन गोपीचंद पडळकर यांनी ते सत्तेत नसताना ही नेटाने केलं,त्यामुळे इटलीचा पास्ता अन बारामतीच्या वांग्याच भरीत खणाऱ्यांना ते कळणार नाही.
याच टेंभूच पाणी मागण्यासाठी मंत्र्याना गावबंदी आंदोलन केलं त्यावेळी जयंत पाटील मंत्री होते. ते मुद्दाम गावबंदी केलेल्या गावात आले अन पडळकर सामोरे गेले,अन आंदोलन पेटलं व गोपीचंद पडळकर सह कार्यकर्त्यांना पोलिसांनी जनावरासारखं लाठ्या काठ्या ने ठोकून काढलं.अनेक कार्यकर्त्यावर जयंत पाटलांनी खोट्या केसेस टाकून त्यांचं आयुष्य बरबाद केलं,वेचून अठरा पगड जातीतील मुलांवर तडीपारीच्या केसेस त्या जयंत पाटलांनी केल्या,मंगळसूत्र चोरीच्या खोट्या गुन्ह्यात ही गोवलं. अन मग 100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला आला,असे 10-20 पवार हे फडणवीस खिश्यात घेऊन फिरतात,तुम्हा प्रस्थापितांचा माज उतरवणारच,शरद पवारांएवढा जातीयवादी माणूस महाराष्ट्रात दुसरा नाही.
आधी लेकीला राजीनामा दे म्हणावं,हजार मतांनी निवडून येणाऱ्या नातवाला राजीनामा द्यायला लावा मग ईव्हीएम च्या गप्पा झोडा,ही गोपीचंद पडळकरांची वाक्य द्वेषातून नसून त्याग अन त्यांनी केलेल्या संघर्षातुन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची बोलकी प्रतिक्रिया आहे.
गावकुसाबाहेर ठेवलेल्या अठरा पगड जातीच्या व बहुजनांच्या पोरांना सरंजामशहांच्या विरोधात हे बोलण्याची हिंमत देवाभाऊने दिलीय म्हणून शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून फडणवीस नको होते,प्रस्थापित असलेल्या जयंत पाटील,शरद पवार,मोहिते सारख्याच्या सत्तेला सुरुंग लावण्याच काम पुढे या बहुजनांच्या पोरांनी नेटाने केलं,अन पवारांचा जातीयवाद संपवण्यासाठी या पुढे ही करतील.