उरण दि 19(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुका सहकारी गृहनिर्माण महासंघ व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उरण शहरातील वाणी आळी येथील तेरापंथी सभागृहात इमारतींचा पुनर्विकास संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला .यावेळी महासंघाचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले. ऍड श्रीप्रसाद परब यांनी इमारतींचा पुनर्विकास संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी रीडेवलपमेंट संदर्भात कायदेशीर बाबी सांगितल्या. रीडेवलपमेंट म्हणजे काय त्यासाठी काय तरतुदी आहेत. आर्किटेक्टची नेमणूक,पीएमसी ची नेमणूक आदी बाबी विषयी मार्गदर्शन केले.सभासद यांनी जागरुक राहून सतर्कता दाखवून संपूर्ण प्रोसेस पूर्ण करावी असे सांगत यावेळी त्यांनी सेल्फ रिडेवलपमेंट विषयी माहिती दिली.तसेच त्यांनी सभासद यांनी विचारलेल्या कनव्हेन्स डीम कन्व्हेन्स ,नॉमिनेशन फॉर्म आदी प्रश्नाबाबत समर्पक उत्तरे दिली.यावेळी सहायक निबंधक राजेंद्र गायकवाड व नवी मुंबई हौसिंग फेडरेशनचे सचिव भास्कर म्हात्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन महासंघाचे संचालक दामोदर केणी तर सुत्र संचालन सचिव वाघ यांनी केले.यावेळी संचालक महेंद्र कुडतरकर, धनाजी पाटील, जगदीश पाटील, सभासद संस्था व उरण मधील गृहनिर्माण संस्था मधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहाशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग
नसिर शिकलगार,पुसेगाव दि.22 : महाराष्ट्र गुजरात कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परम पूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित...
हडपसर प्रतिनिधी ;
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ साली घेण्यात आलेल्या समाज कल्याण अधिकारी परीक्षेत रोहित अनिल वाघ राज्यात प्रथम आला. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल महाविदयालयाचे प्राचार्य डॉ....
अकोले तालुक्यातील मवेशी गावात 'प्रशासन गाव की ओर' उपक्रमाचे आयोजन ;जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मुक्काम मवेशी गावात
शिर्डी, दि.२१ - प्रशासनाने सकारात्मकता दाखविली...