उदगीर : राज्याच्या गृह विभागाने उदगीर येथे सुरू केलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या निमित्ताने उदगिरकरांची नवी ओळख आजपासून एम.एच. ५५ (महाराष्ट्र ५५) अशी झाली आहे.
उदगिरकरांची ही जिल्ह्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
उदगिरकरांचा बहुप्रतिक्षित मागणीचा निर्णय मार्गी लागून आचारसंहितेच्या आधी हे नवीन कार्यालय उदगीर येथे सुरू झाल्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले. कार्यक्रमास माजी आ. गोविंदराव केंद्रे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, शिवानंद हैबतपुरे, रिपाइं नेते देविदास कांबळे, चेअरमन भरत चामले, रामराव बिरादार, राष्ट्रवादीचे समीर शेख, विजय निटुरे ,मनोज पुदाले, अभिजित साकोळकर, बसवराज पाटील, सय्यद जानीमियाँ, बालाजी भोसले, वसंत पाटील, उत्तराताई कलबुर्गे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, सर्जेराव भांगे, आरटीओ कार्यालयाचे सुनील खंडागळे, अशोक जाधव, सुनील शिंदे, विजय पाटील, माळी, बाळासाहेब मरलापल्ले, ॲड. दीपाली औटे, ॲड. वर्षा कांबळे, शिवकर्णा अंधारे, मोईज शेख, खिजर मोमीन अनिल मुदाळे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमात विविध मोटार वाहन चालक, मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यालयामुळे वाहन नोंदणीची सोय होणार…
क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले, उदगीर येथे सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामुळे उदगीर व या कार्यालयास जोडण्यात आलेल्या तालुक्यातील वाहन नोंदणी, नुतनीकरण वाहन तपासणी, वाहन चालक परवाना अशी कामे या कार्यालयातून सुरू होणार आहे. उदगीर व परिसरातील तालुक्यातील वाहन असलेल्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे. भविष्यात उदगीर येथे ऑटोनगरी उभारण्यात येणार आहे.