उरण आगारातुन होळीसाठी कोकणात जाण्यास ज्यादा बसेस 

0

कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पाठपुराव्याला यश.

उरण दि १२(विठ्ठल ममताबादे ):कोकणात होळी सणासाठी प्रवास करताना कोकणी माणसाला कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नयेत, कोकणी माणसाचा प्रवास सुखाचा, सुलभ व्हावा, या दृष्टिकोनातून दरवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्था (उरण)च्या पाठपुराव्याने उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी व उरणमध्ये परत येण्यासाठी जादा बस सोडल्या जातात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्थे (उरण)तर्फे उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी जादा बस सोडण्यात याव्‍यात, अशी मागणी करण्यात आली होती या मागणीला आता यश आले असून उरण आगारातुन कोकणात जाण्यासाठी बसेस सोडण्यात आले आहेत.

या जादा बस सोडण्यासाठी संस्थेचे सचिव रवींद्र चव्हाण, कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी यांनी उरण बस आगार तसेच मुंबई कार्यालय, मुंबई उप विभाग कार्यालय येथे पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहाराला आता यश आले आहे.११मार्च ते १२ मार्च या दरम्यान बसेस उरण आगारातून सोडण्यात आले आहेत अशी माहिती कोकणवासीय उत्कर्ष संस्थेचे सचिव रविंद्र चव्हाण यांनी दिली.मुंबई कार्यालय, उपविभाग कार्यालय यांनी पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. विभागीय वाहतूक अधिकारी अमित गिरमे तसेच उरण आगाराचे व्यवस्थापक गीता कोंडार तसेच उरण आगार स्थानक प्रमुख अमोल दराडे यांनी या पत्रव्यवहाराची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याने या सर्वांचे कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी विशेष आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here