उरण दि. १९ (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यात अपघातांचे वाढते प्रमाण व अपघातामुळे मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून तसेच उपाययोजनेचा भाग म्हणून उरण चारफाटा ते नविन शेवा या मार्गावर गतिरोधक बसविण्यात यावेत.चारफाटा , आदय क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हायस्कूल, नवीन शेवा गाव आदि ठिकाणी गतिरोधकांची नितांत गरज आहे. ही गरज ओळखून शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मयूर सूतार यांनी सिडको प्रशासनाकडे या मार्गावर त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.
रात्री अपरात्री अनेक वाहने कोणतेही नियम न पाळता वाहने जोरात पळवितात त्यामूळे अपघात होतात.त्या अपघातात एखाद्याचा मृत्यू होतो.म्हणून हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी मयूर सूतार यांनी उरण चारफाटा ते नविन शेवा मार्गावर (मूख्य रस्त्यावर )गतिरोधक बसविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.या पत्रव्यवहाराची दखल घेउन सिडकोचे कार्यकारी अभियंता मोहन मुंडे यांनी सदर समस्या बाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. या मार्गावर गतिरोधक झाल्यास भविष्यात होणारे अनेक अपघात कमी होणार आहेत व त्यामुळे मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी होणार आहे.