उरण तालुक्यात सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्याची मागणी.

0

वेळेत उपचार मिळत नसल्याने पशु पक्षी, वन्य जीव यांचे जीवन संकटात.

उरण दि १९(विठ्ठल ममताबादे ) : वन्य जीव, पशु पक्षी यांना अपघात झाल्यास किंवा वन्य जीव,पशु पक्षी आजारी पडल्यास, त्यांना दुखापत झाल्यास उरण तालुक्यात कुठेही सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त पशु वैद्यकीय रुग्णालय नसल्याने दिवसेंदिवस पशु पक्षी, वन्य जीव यांच्या मृत्यू संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. यात पशु पक्षी, वन्य जीव यांना वेळेत उपचार न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे.त्यामुळे पशु पक्षी, वन्य जीव यांचे प्राण वाचावेत, त्यांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी उरण तालुक्यात सुसज्ज व सर्व सोयीसुविधायुक्त पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्याची मागणी पत्रव्यवहाराद्वारे फॉन या निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी संस्थेने प्रशासनाकडे केली आहे.

पशु वैद्यकीय रुग्णालय नसल्याने एका पक्षाला नुकताच प्राण गमवावे लागल्याची नुकतीच घटना उरण मध्ये घडली आहे.दिनांक १४/७/२०२४ रोजी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरण-रायगडचे वन्यजीव अभ्यासक व बचावकर्ते निकेतन रमेश ठाकूर (बोकडविरा) यांना फुंडे, उरण येथील रहिवासी  राहुल विनोद म्हात्रे ह्याचा मेसेज आला की त्यांना एक पक्षी सापडलाय आणि तो लेसर नोड्डी (Anous tenuirostris) डोलमान्या हा होता, तरी पुन्हा खात्री करण्यासाठी  अविनाश भगत आणि हेमंत वारे या अनुभवी तज्ञ पक्षी निरीक्षकांना तो फोटो पाठवला असता त्यांनी ही तो पक्षी लेसर नॉडी असल्याचे सांगितले पक्षी रेसक्यू करून लगेचच उरणचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कोकरेना त्या पक्ष्याविषयी आणि त्याच्या सद्य परिस्थिती बद्दल महिती दिली. लेसर नॉडी हा पक्षी पेलाजिक पक्षी म्हणजे जे पक्षी त्यांचे संपूर्ण आयुष्य खोल समुद्रात बेटांवर व्यतीत करतात. त्यांचा माणसांशी जास्त संबंध येत नाही त्यामुळे ते जर वादळामुळे भरकटून खूपच अशक्त व थकलेले असल्याने आजारी अथवा जखमी अवस्थेत आले तर भीती आणि आजारपणामुळे तसेच माणसांच्या संपर्कात आल्यास घाबरून धक्क्याने लगेचच दगावतात बऱ्याच केस मध्ये असेच होते, फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने या आधी ही अनेक वन्यजीवाना योग्य वेळेत उपचार मिळवून देऊन जीवनदान दिले आहे. तो पक्षी जखमी असल्याने त्या पक्षास तत्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले पण सदर पक्षी हा जहाजावर सापडला असल्याने त्याला निकेतन ठाकूर यांच्यापर्यंत पोहचण्यास खूप उशीर झाला व पक्षास तत्काळ उपचार न मिळाल्यामुळे जखमी व अशक्त पक्षाचा दुर्दैवी अंत झाला. पुढे तो पक्षी वैज्ञानिक अभ्यासासाठी संशोधनकर्त्यांना उपलब्ध व्हावा व त्याचे शरीर जतन व्हावे म्हणून फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेतर्फे उरण वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कोकरे व कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्यामार्फत तो टॅक्सीदेर्मी करण्यासाठी बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) या संस्थेकडे पाठवण्यात आला. १४ जुलैला नवी मुंबई मध्ये आणखी एक लेसर नॉडी पक्षी सापडला व त्याचा देखील दुर्दैवाने उपचारा अभावी मृत्यू झाला.e-bird या संकेत स्थळा‌द्वारे जगभरात पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या जातात त्या आधारे असे समजते की, लेसर नॉडी हा पक्षी त्या आधी ऑगस्ट, २०१९ मध्ये मामाची वाडी पालघर येथून रेस्क्यू करण्यात आला होता आणि वादळात भरकटल्याने अशक्त अवस्थेत त्याचा ही मृत्यू झाला होता. लेसर नॉडी या पक्षाची ही महाराष्ट्रातील दुसरी नोंद असून रायगडमधील पहिलीच नोंद आहे.

सुसज्ज व सर्व सोयीसुविधायुक्त पशुवैद्यकीय रुग्णालयाची रायगड व नवी मुंबई परिसरामध्ये अत्यंत गरज आहे असे. वनविभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून निवेदनां‌द्वारे फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरण रायगड तर्फे अनेकदा मागणी केली आहे. उरण व नवी मुंबईमध्ये सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्यामुळे या जखमी वन्यजीवांना लांब मुंबई आणि पुणे येथे असलेल्या वन्यजीव उपचार केंद्रात न्यावे लागते. दुर्दैवाने पक्ष्याला वाचवता आले नाही, असे फ्रेंड्स ऑफ नेचर चिरनेर उरण रायगड चे स्वयंसेवक व वन्यजीव अभ्यासक निकेतन रमेश ठाकूर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here