उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदार संघातील वर्षानुवर्षे विविध प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी व विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी उरण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांना महा विकास आघाडी कडून उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे झोपडपट्टी व जिंर्ण चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केली आहे.
विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी चालू केली आहे.उरण विधानसभा मतदार संघ म वि आ कडून ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे विरोधी आमदारांनी आताशीच गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे.मात्र म वि आ कडून कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळाली तर विरोधी आमदारांचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत.कारण या मतदार संघावर काँग्रेस पक्षाच्या महेंद्र शेठ घरत यांची मजबूत पकड असून जनमानसात दांडगा जनसंपर्क आहे.त्यांनी कॉग्रेसची संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले.
त्यामुळे या मतदारसंघातील विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच महा विकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी उरण मतदार संघातून कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांना उमेदवारी मिळावी यासाठी झोपडपट्टी व जीर्ण चाळी विकास सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक शंकर पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पत्राद्वारे केला आहे.तसेच उरण विधानसभा मतदारसंघात महा विकास आघाडी चा झेंडा फडणविसांठी महेंद्र शेठ घरत हेच योग्य उमेदवार आहेत.याची सविस्तर माहिती देण्यासाठी दिपक पाटील हे लवकरच लवकर दिल्ली येथील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.