उरण दि 23(विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य विजय भोईर व उद्योजक विकास भोईर या दोघा जुळ्या भावांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजय विकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज 22 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून घेण्यात आलेल्या मिनी मॅरोथॉन,जलतरण ,बुद्धिबळ अशा स्पर्धां मध्ये अनेक विद्यार्थ्यांनि यश संपादन केले आहे. सकाळी 8 वाजता मिनी मॅरोथॉन स्पर्धेचे उदघाटन जेएनपीटी चे मुख्य प्रबंधक जयवंत ढवळे यांच्या हस्ते फॅग दाखवून सुरवात करण्यात आली .तर जलतरण स्पर्धेचे उद्घाटन उरणचे आमदार महेश बाळदी यांच्या हस्ते करण्यात आले असून स्पर्धांना सुरवात करण्यात आली.
विजय विकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विजय आणि विकास या जुळ्या भावांच्या वाढदिवसाच्या निमित्त दरवर्षी अनेक सामाजिक शैक्षणिक ,क्रीडा,आरोग्य ,विषयक उपक्रम राबविले जात आहेत. गोरगरिबांना अन्नदान, गरजूना मदत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,आरोग्य विषक रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
क्रीडा विषयक कराटे स्पर्धा ,फळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले आहेत. आपण समाज्याचे काहीतरी देणे लागतो या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत.या वर्षी मिनी मॅरोथॉन,जलतरण स्पर्धा ,बुद्धीबळ स्पर्धा ,महिलांच्या फेर्यांच्या गाणांच्या स्पर्धा घेण्यात आल्या या मध्ये अनेकांनी आपले कला कौशल्य दाखवीत विजय संपादन केले .विजय संपादन केलेल्या सर्व स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले आले.तर सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना सर्टिफिकेट देण्यात आले आहे.