उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अजिवन अध्ययण व निरंतर शिक्षण विभाग तसेच श्री गोपाळकृष्ण वाचनालय देऊळवाडी उरण यांच्या संयुक्त विदयामाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.उरण शहरात देऊळवाडी येथे असलेल्या श्री. गोपाळकृष्ण वाचनालयात आयोजित कार्यक्रमात विदयार्थ्याना ग्रंथालयात आयोजित पुस्तक प्रदर्शन दाखवन्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.एल.एल.ई. विभाग प्रमुख प्रा.व्हि. एस. इंदूलकर हे होते. त्यांनी वाचनाचे महत्त्व सांगूण विदयार्थ्यांनी रोज काहितरी वाचण्याचा संकल्प करावा असे सांगितले. यावेळी ग्रंथालयाचे सचिव श्रीकांत श्रीकृष्ण वैशंपायन, जिजा घरत (ग्रंथपाल),कल्पना गोगट (सदस्य ग्रंथालय समिती), राजेश शहा (सदस्य ग्रंथालय समिती) आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विदयार्थ्यांनी प्रकट वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. कारूळकर यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. डॉ. एच. के. जगताप यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्रा. डॉ. डी. पी. हिंगमिरे यांनी तर आभार आय.क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. डॉ. आर. चव्हाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. कु. हन्नत शेख, प्रा. मेघा रेड्डी व प्रा. पुजा गुप्ता यांनी केले.या कार्यक्रमात मोठया संख्येने विदयार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली.