एम. एस. जी. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राशष्ट्रीय हिंदी दिवस  मोठ्या उत्साहात साजरा

0

येवला प्रतिनिधी 

अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विषयाचे शिक्षक अजहर खतीब हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, माता सरस्वती पुजन व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्शिया अंसारी यांनी केले.

इयत्ता ७वी च्या विद्यार्थिनी नुतन गायकवाड, श्रेया दाभाडे, पूर्वा जगझाप, प्रीती थोरात, खुशी शिनगारे, श्रुती आहेर, वैष्णवी पवार, वैदेही जेजुरकर, अक्षदा रोहोम, आर्या मेहेकर, वेदश्री वडनेरे, समृद्धी गायकवाड यांनी हिंदी कविता सादर केली.यानंतर वैष्णवी आहेर, गौरव आहेर, श्रावणी सोनवणे, अनुष्का आरखडे, सिद्धेश्वरी दाभाडे, नुतन गायकवाड यांनी हिंदी दिवस वर आपले भाषण सादर केले. यानंतर आरती राजपूत, मुसर्रत अंसारी, निलिमा देशमुख यांनी आपले विचार प्रकट केले.अमोल आहेर यांनी हिंदी कविता सादर केली.अध्यक्षीय भाषणात अजहर खतीब यांनी हिंदी भाषेचे महत्त्व व हिंदी भाषा लवकरच सर्वात जास्त बोलली जाणारी जगातील प्रथम क्रमांकाची भाषा होईल असे नमूद केले.यावेळी विद्यार्थ्यानी हिंदी दिवस भित्तिचित्र व घोषवाक्य लिहिले होते. स्कुलचे दिवसभर कामकाज हिंदीत चालले.

याप्रसंगी प्रिंसिपल अल्ताफ खान, गणेश सोनवणे, अजीम पटेल, सचिन घोड़के, राजेश कांबळे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, नीलिमा देशमुख, सुनिता वडे, शोभा निकम, सुस्मिता देशमुख आदि सह सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी शिनगारे व अश्विनी देवरे यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here