एस. एस. पाटील शाळेचे क्रिडा क्षेत्रातील विक्रमी शिखर

0

उरण दि. 22 (विठ्ठल ममताबादे ) एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी उरण या शाळेतील विदयार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात पुन्हा एकदा नाविण्यपूर्ण कामगिरी बजावली आहे.10 वी यूनिफाइड जिल्हा स्तरीय चॅम्पियनशीप 2022 ही स्पर्धा सातारा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एस. एस. पाटील (SSP) शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे.स्वयम पाटील इयत्ता दुसरी सुवर्णपदक,स्मिथ नारंगीकर इयत्ता दुसरी सुवर्णपदक,दिव्य मुंबईकर इयत्ता दुसरी सुवर्णपदक, आदित्य घोड़के इयत्ता सहावी सुवर्णपदक,आरुष पाटील इयत्ता सातवी सुवर्णपदक,रूद्र भोसले इयत्ता सातवी सुवर्णपदक,अक्षरा घोडके इयत्ता सहावी सुवर्णपदक,त्रिशिता भोईर इयत्ता आठवी सुवर्णपदक या सर्व विद्यार्थ्यांनी विक्रमी यश प्राप्त केले आहे. या सर्व सुवर्णपदक विजेत्यांना शिक्षक सुरज टकले यांचे कडून प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळाले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका मृदूला धोडी यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नेहमीच मिळत असते. आणि यातून विद्यार्थ्याना योग्य दिशा मिळत आहे.सुवर्णपदक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांवर विविध क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here