कामगारांना कायम करा, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांची मागणी.
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )महावितरण महापारेषण व महानिर्मिती वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे msedc contract base worker’s strike . वर्षानुवर्षे कंत्राटदारांकडून होत असलेले आर्थिक व मानसिक शोषण,याला काही अधिकाऱ्यांनी दिलेली छुपी साथ हे मोडीत काढुन कामगारांना कायम करावे, अन्यथा त्यांना माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमलेल्या मा.मनोज रानडे समितीच्या शिफारसी प्रमाणे कंत्राटदार मुक्त व वयाच्या ६० वर्षा पर्यंत नोकरीत संरक्षण द्यावे. तिन्ही कंपनीत मागील १५ ते २० वर्षे अल्प वेतनात काम करणाऱ्या कुशल व अनुभवी सर्व वीज कंत्राटी कामगारांना भरती प्रकीये मध्ये विशेष आरक्षण व वयात सवलत द्यावी, भ्रष्ट कंत्राटदार व त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागण्या साठी दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी मंत्रालय मुंबई येथे काढलेल्या मोर्चाच्या वेळी झालेल्या त्रिपक्षीय बैठकी मध्ये
महत्वपूर्ण प्रश्न प्रलंबितच राहिले.
कंत्राटदार मुक्त व वयाच्या ६० वर्षा पर्यंत नोकरीत संरक्षण, तिन्ही कंपनीतील भरती प्रकीये मध्ये आरक्षण व वयात सवलत कंत्राटदारांवर कारवाई अशी विविध आश्वासने प्रशासनाने दिली होती.पण या मधील कोणत्याही बाबतीत ठोस कार्यवाही अद्याप पर्यंत सुरू झाली नाही, त्यामुळे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) दि ११ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर अधिवेशना मध्ये चाचा नेहरू पार्क पासून विधानसभा पर्यंत लक्षवेधी मोर्चा काढणार आहे.यामध्ये न्याय न मिळाल्यास मा. उर्जामंत्री यांच्या निवासस्थानी मोर्चा वळवावा लागेल. या मोर्चा मध्ये महाराष्ट्रातील हजारो वीज कंत्राटी कामगार एकजुटीने सहभागी होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ)अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिलेली आहे . ४ जानेवारी २०२३ नंतर कोणतीही कोणत्याही सकारात्मक चर्चा न होताच परस्पर प्रशासनाने भरती जाहीर केली.वीज कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक ऊर्जामंत्र्यांच्या सूचनेला प्रशासन केराची टोपली दाखवत आहे.कंत्राटी कामगारांच्या वेतनात रोजगार देताना मोठ्या आर्थिक उलाढाली होतात यात मोठे गौड बंगाल आहे असा आरोप नीलेश खरात यांनी केला आहे. मा.ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांना आता पर्यंत संघटनेने प्रत्यक्ष १५ वेळा निवेदन दिले. मात्र भारतीय मजदूर संघाच्याच संघटनेला त्यांनी आजवर भेटीसाठी न दिलेला वेळ व त्यांनी दिलेल्या आश्वासनाचा विसर त्यांना पडल्याने संघ परिवारात मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यामुळे ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने ही भरती प्रक्रिया थांबवून वीज कंत्राटी कामगार संघा सोबत प्रलंबित विषयां साठी बैठक आयोजित करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी ऊर्जामंत्र्याकडे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केली आ